नाशिक

मालेगावी अतिक्रमणविरोधी कारवाई; रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साहित्य जप्त.

CD
16213 मालेगाव : अतिक्रमण निर्मुलन विभागाने जप्त केलेल्या दुचाकी ----- मालेगावला अतिक्रमण हटाव मोहिम रस्त्यावरील दुचाकींसह इतर साहित्य जप्त सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. ६ : शहरात दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. काही नागरीक वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व आयेशानगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रस्त्यावरील ९ दुचाकी व साहित्य जप्त केले शहरात दोन दिवसांपूर्वी किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाने गुरुवारी (ता. ५) जुना आग्रा रोड, सुपर मार्केट जवळ रस्त्याला लागून उभ्या केलेल्या नऊ दुचाकी, चार लोखंडी स्टूल, होडिंग बॅनर व इतर साहित्य जप्त करून आयेशानगर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. या कारवाईने जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. उपायुक्त सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बाळू धोंडगे, प्रभाग अधिकारी संतोष गायकवाड, अतिक्रमण अधीक्षक प्रवीण पवार, आयेशानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग बहुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT