नाशिक

मनपाच्या कचरा डंपरखाली चिरडून अकरा वर्षीय चिमुरडा ठार

CD
16252 दस्तगीर अली मोहंमद सईद ---- 16253 मालेगाव : अपघातस्थळी संतप्त नागरीकांची झालेली गर्दी ------ महापालिकेच्या कचरा डंपरखाली चिरडून बारा वर्षीय बालक ठार सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १८ : येथील नवीन इस्लामपुरा भागात खानका सईदीया मशिद रस्त्यावर महानगरपालिकेचा कचरा संकलन करणाऱ्या कोणार्क कंपनीच्या डंपरखाली चिरडून १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. दस्तगीर अली मोहंमद सईद (वय १२, रमजानपुरा टाॅवर गल्ली) असे मुलाचे नाव आहे. दुपारी बाराला ही घटना घडली. या वेळी संतप्त नागरीकांनी खानका मशिदीजवळ धरणे आंदोलन केले. दस्तगीर अली हा मुलगा सायकलवर इक्बाल डाबी बाजारातून साहित्य घेवून तो घराकडे जात होता. परिसरात याचवेळी कोणार्क कंपनीचा डंपर (एमएच ४१ ए ३१८५) कचरा उचलत असतांना याच डंपरने मुलाला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. रमजानपुरा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी पुढील कार्यवाही केली. अपघातानंतर मृत बालकाच्या नातेवाईक व रमजानपुरा भागातील नागरीकांनी शव विच्छेदनगृहाजवळ धरणे आंदोलन केले. मृत मुलाच्या नातेवाईकांनी कोणार्क कंपनीने २० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. जोपर्यंत लेखी आश्‍वासन देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. मनपाने एवढ्या वर्दळीच्या भागात डंपर पाठविणे गैर आहे. अवजड वाहनांना बंदी करावी, रस्त्यावरील व बाजाराचे अतीक्रमण हटवावे. अतीक्रमणच या अपघाताला कारणीभूत आहे अश्या भावना व्यक्त केल्या. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त सुनिता कुमावत, उपायुक्त तौसीफ शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मृत मुलाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष महासभा बोलावून महासभेत प्रस्ताव मांडू. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मदत केली जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आयशानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : ओबीसी हॉस्टेल बांधण्यासाठी महसूल विभागाचा जागा देण्याचा निर्णय

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT