मालेगावला अपघातात
चार जण जखमी
मालेगाव : मनमाड - मालेगाव रस्त्यावर ट्रकच्या धडकेने पिकअपमधील पाच जण व ट्रकमधील क्लिनर जखमी झाला. भरधाव येत असतांना चंदनपुरी शिवारात शबरीमाता नगरजवळ विरुध्द बाजुने चालवून नेणाऱ्या ट्रकने (केए ५६- ७३२२) समोरुन येणाऱ्या पिकअला जबर धडक दिली. अपघातात पिकअपमधील उसतोड कामगार कृष्णा रविंद्र पवार (वय २७, रा. डोंगराळे, ता. साक्री), दादु केशऱ्या भिल्ल (वय ३०), सुशिलाबाई दादु भिल्ल (वय २५), अनिताबाई किसन पवार (वय २५, दोन्ही रा. काकरदा, ता. शहादा), धनराज मन्साराम ठाकरे (वय ४२, रा. डोंगराळे, ता. साक्री) तसेच ट्रकमधील क्लिनर (नाव, गाव माहित नाही) हे सहा जण जखमी झाले. शनिवारी (ता. २४) मध्यरात्री साडेबाराला हा अपघात झाला. पिकअपचालक देवमन भगवान वाघ (वय २८, रा. धांद्रेखुर्द, ता. शहादा) यांच्या तक्रारीवरुन किल्ला पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
-----
टेहरे फाट्यावरील
दोन दुकाने फोडली
मालेगाव : येथील टेहरे फाटावरील बच्छाव सर्कल जवळील चोरट्यांनी दोन दुकाने फोडली. आशापुरी टेक्सटाईल मॉल ॲन्ड गिफ्ट हाऊस व वरुण मसाले व किराणा या दुकानांच्या छताचा पत्रा कापून आतील साडेसत्तावीस हजार रुपये रोख चोरुन नेले. चाेरट्यांनी बापू नागु ठाकरे (वय ५०, रा. आनंदनगर सोयगाव) यांच्या आशपुरी टेक्स्टाईल दुकानातून २४ हजार ५०० रुपये व वरुण राजेंद्र सुराणा यांच्या मसाला दुकानातील गल्ल्यातून ३ हजाराची चिल्लर असा २७ हजार ५०० रुपये चोरुन नेले. रविवारी (ता. २५) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घरफोडी झाली. बापू ठाकरे यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.