नाशिक

घात - अपघात

CD
संभाजीनगर येथील ट्रक चालकाकडून लंपास मालेगाव : संभाजीनगर येथील दादासाहेब नामदेव म्हस्के (वय ५०, रा. आखातवाडा, पैठण) यांच्या ट्रकची (एमएच २० जीसी ६०६३) चालक आकाश सुभाष राऊत (वय २२, रा. मनमाड, ता. नांदगाव) याने सदर ट्रक परवानगी विना अपहार करुन कुठेतरी विल्हेवाट लावली. येथील मुंबई - आग्रा महामार्गावर १८ सप्टेंबरला दुपारी चारला हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे. ----- अपघातात तरुणाचा अस्ताने येथे मृत्यू मालेगाव : झोडगे अस्ताणे रस्त्यावरील अस्ताणे शिवारात पोल्ट्री फॉर्मसमोर पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. चेतन बहादुर देवरे (वय २७, रा. अस्ताणे) हा तरुण रस्त्याने पायी येत असतांना त्यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. १५ ऑक्टाेबरला रात्री पाऊणेदहाला हा अपघात झाला. छोटू नरसिंग देवरे (वय ५८, रा. अस्ताणे) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ------ वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू मालेगाव : येथील बोधे फाट्यावरील निवांत हॉटेलजवळ पादचाऱ्यास दुचाकीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. आबा शिवराम शिंदे (वय ४४, रा. देवारपाडे, ता. मालेगाव) हे पायी चालत असतांना त्यांना पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच ४१ एएच ४५०४) जबर धडक दिली. अपघातात आबा याांच्या डोक्यास, छातीस मार लागून त्यांचा मृत्यू झाला. २२ आक्टोबरला सायंकाळी सातला हा अपघात झाला. ज्ञानेश्‍वर जिभाऊ शिंदे (वय ३७, रा. देवारपाडे, ता. मालेगाव) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द (नाव, गाव माहित नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ----- दोघा दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू मालेगाव : दहिवाळ शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू झाला. महेंद्र युवराज गायकवाड (वय २९) व त्याचा मित्र संदीप बारकू बहिलम (वय २९, रा. नरडाणे, ता. मालेगाव) हे चाळीसगावहून मालेगावला दुचाकीवरुन येत होते. दहिवाळ शिवारात शनि मंदिराच्या रस्त्याच्या वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिली. अपघातात दाेघांचा मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. सोयगाव शिवारात बेशुद्ध व्यक्तीचा मृत्यू मालेगाव : येथील हरिचंद्र केदा सैंदाणे (वय ४४, रा. शिवाजीनगर) हे शुक्रवारी (ता. २३) दुपारी पावणेसहाला सोयगाव भागातील इंदिरानगर समोरील रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत मिळून आले. रुग्णवाहिकाचालक गणेश पवार याने त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. भामरे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. ----- चंदनपुरी भागात दुचाकी लंपास मालेगाव : चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील मोहन जगन्नाथ सूर्यवंशी (वय ४६) यांची ५० हजाराची युनिकॉर्न हाेंडा दुचाकी (एमएच ४१ बीटी १६३३) चोरट्यांनी चोरुन नेली. १६ ऑक्टोबरला घरासमोर लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी पळविली. किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Rashmika Mandanna: ‘त्या’ दिवसांत विजय असतो रश्मिकाचा आधार; अभिनेत्रीने सांगितली एक खास गोष्ट

Beed Theft : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर थांबलेल्या प्रवाशांच्या कारचे लॉक उघडून ६.५५ लाखांचे दागिने लंपास; बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT