corona patient 123.jpg 
नाशिक

धक्कादायक! 'त्या' कोरोनाबाधित महिलेचेही मालेगाव कनेक्‍शन..भीती ठरली खरी! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : येवल्यात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिला रुग्णाचेही मालेगाव कनेक्‍शन निघाले असून, येवल्यातून मोठ्या प्रमाणात मालेगावला होणारी ये-जा यामुळे शहरात आठवड्यापासून भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी एक 47 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने ही भीती खरी ठरली असून, येवलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. दरम्यान, या महिलेच्या कुटुंबातील नऊ जणांना शुक्रवारी (ता. 24) आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी नाशिकला हलविले आहे. 

कोरोनाबाधित महिला रुग्णाचेही मालेगाव कनेक्‍शन?
बाधित महिलेची सून 11 तारखेला येवला ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आली होती. येथील डॉक्‍टरांनी तिला नाशिकला संदर्भसेवा रुग्णालयात जाण्यासाठी सल्ला देत 108 रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली. मात्र कुटुंबीय नाशिकला न जाता गर्भवतीला मालेगाव येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र तेथे तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याने त्यांनी मालेगावमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिला बाळंतपणासाठी दाखल केले. त्यानंतर मनमाड येथून रुग्णवाहिका करून सुनेला मालेगाव येथून येवल्यातील अमिनानगर येथे आणले होते. त्यातूनच 47 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

प्रशासन सतर्क... 
मालेगावच्या संपर्कामुळे शहरासह तालुक्‍याची चिंता अजूनच वाढली आहे. महिनाभरापासून प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज असताना शुक्रवारी येथील पहिला रुग्ण आढळल्याने संपूर्ण शहर चिंतेत पडले आहे. माहिती मिळताच मनमाड पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे रात्री येवल्यात आल्यानंतर त्यांनी पोलिस निरीक्षक संदीप कोळी व सहकार्यासह या भागाला भेट देऊन माहिती घेतली व सूचना केल्या. बाधित महिला राहत असलेल्या परिसरात रात्रीपासूनच कंटेन्मेंट झोन करणार असल्याचे तसेच या महिलेच्या माहेर व सासरच्या अशा नऊ जणांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले

पोलिस रात्रीही दक्ष

येवल्यात मालेगावहून येणाऱ्यांची संख्या अधिक असून, रात्रीच्या वेळेस काही नातेवाईक येवल्यात आल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पोलिस रात्रीही दक्ष राहत असून, असा प्रकार होत नसल्याचे सांगतात. मात्र येवल्यात मालेगावचे कनेक्‍शन असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT