नाशिक

लाचखोर आयुक्तापेक्षा ‘पीए’च्या घरात जास्त रोकड

CD
मालेगावातील लाचप्रकरण--लोगो -------------- लाचखोर आयुक्तापेक्षा ‘पीए’च्या घरी मोठे घबाड ---------- स्थावर मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे जप्त : बँक लॉकरचा शोध सुरू ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३० : मालेगाव महापालिकेचा आयुक्त रवींद्र जाधव, त्याचा स्वीय सहायक नीलेश पाटील आणि लेखापाल हरीश डिंबर यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती मोठ्या प्रमाणात रोकड लागली आहे. विशेषतः आयुक्त जाधव याच्या दोन घरांच्या घरझडतीपेक्षा स्वीय सहायक पाटीलच्या घरात जास्त रोकड मिळाली आहे. दरम्यान, तिघा लाचखोरांच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून संशयितांच्या बँक लॉकरचा शोध सुरू केला आहे. .... ठेकेदारांच्या कामाच्या बिलांपोटी प्रत्येकी चार टक्क्यांप्रमाणे ८० हजारांच्या लाचेची मागणी आयुक्त जाधव, नीलेश पाटील, हरीश डिंबर यांनी केली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी जाधव, पाटील यांना घोटी येथे तर डिंबर यास मालेगावातून अटक केली होती. त्याचवेळी पथकांनी या तिघांच्या घरावर एकावेळी छापेमारी करीत घरझडती सुरू केली होती. तिन्ही लाचखोरांच्या घरी सुमारे १२ ते १६ तास झडती सुरू होती. त्यात लाचखोर आयुक्त जाधव यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील फ्लॅटमधून ११ लाख ८७ हजारांची रोकड तर, मालेगाव येथील शासकीय निवासस्थानातून ९ लाख ३८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नीलेश पाटील याच्या घरझडतीतून ३१ लाख १५ हजारांची रोकड जप्त करण्यत आली आहे. लेखापाल डिंबर याच्या घरातून १३ लाखांच्या रोकड व ऐवजासह १५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाचखोरांच्या घरातून स्थावर मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. तिघांच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली असून, लॉकरचा शोध घेतला जात आहे. यासाठी संबंधित बँकांकडे ती गोठविण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार आहे. तिन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता.३१) संपत असल्याने मालेगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

SCROLL FOR NEXT