नाशिक

घात - अपघात

CD
सोयगावला घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास मालेगाव : येथील सोयगाव नववसाहत भागात नागाई कॉलनीतील लक्ष्मण कृष्णा निकम (वय ५६, रा. सटाणा नाका) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील लोखंडी कपाट व लॉकरमधून सव्वादोन लाखाचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी १ लाख ३५ हजाराचे मंगळसुत्र, २५ हजाराची सोन्याची अंगठी, ४० हजाराचे कानातले, २५ हजार ८०० रुपये रोख असा एकूण २ लाख २५ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ------ निमशेवडी भागात झाडावर पडून मृत्यू मालेगाव : निमशेवडी (ता. मालेगाव) येथील शिवाजी देवराम कन्नोर (वय ५५) हे १ ऑक्टोबरला दुपारी तीनला निमशेवडी येथील फॉरेस्टच्या जंगलात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले असता ते झाडावरुन पडून जखमी झाले. त्यांना प्रथम येथील सामान्य रुग्णालयात व तेथून शिर्डी येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पीटल कोकमठाण येथे दाखल केले. उपचार सुरु असताना १५ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराला त्यांचे निधन झाले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. ------ राजमाने परिसरात गळफास घेत आत्महत्या मालेगाव : राजमाने (ता. मालेगाव) येथील अनिल रामचंद्र डिंगर यांच्या शेताजवळ प्रकाश राजधर भिल (वय ३८, रा. पिंजारपाडे, ता. चाळीसगाव) या तरुणाने आयशर वाहनामध्ये गळफास घेतला. नातेवाईक बापू नवरे यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. ------ कलेक्टर पट्टा भागात तरुणावर चाकूने हल्ला मालेगाव : येथील कलेक्टरपट्टा भागातील बलरामनगर येथील प्रसाद बाळकृष्ण चौधरी (वय २३, रा. उज्वल शाळेसमोर) हा तरुण दुचाकीने घरी येत असतांना संगमेश्‍वर काटे हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघा अनोळखींनी त्यांची गाडी अडवली. मोबाईल हिसकावत असतांना प्रसाद यांच्याशी झटापटी करुन त्यांच्यावर चाकूने वार केला. खिशाच्या पाकिटात असलेले बाराशे रुपये बळजबरीने हिसकावून दोघांनी दुचाकीवरुन पोबारा केला. १ नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. छावणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अंजुम अतिकुर रहेमान (३१, रा. हिरापुरा, डीपी गल्लीजवळ, मालेगाव) याला अटक केली आहे. पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंनी पुण्यात केली दिवाळी फराळाची तपासणी; लाडू हाताने कुस्करला अन्...

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

SCROLL FOR NEXT