नाशिक

दुष्काळ जाहीर होऊनही महाविद्यालयांकडून परीक्षा फी वसुली सुरूच

CD
फोटो -16062 मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना साथी प्रतिष्ठानचे योगेश कळमकर व विद्यार्थी. ----- दुष्काळ जाहीर होऊनही महाविद्यालयाकडून शुल्क आकारणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ८ : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मालेगाव तालुक्याचाही यात समावेश आहे. मालेगावच्या १५१ गावांमधील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मालेगाव शहरात येतात. ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांची पिके खराब झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीच्या प्रश्‍नासह जगण्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. यातच शहरातील शाळा, महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांकडून शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. शुल्क न भरल्यास चाचणी परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे महाविद्यालयातर्फे सांगितले जात आहे. सक्तीची शुल्क वसुली थांबवावी. शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना ती परत द्यावी. तसेच शुल्क माफ करावे, अशी मागणी साथी प्रतिष्ठानने केली आहे. या संदर्भात त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने २५ सप्टेंबरला तालुका दुष्काळ जाहीर करूनही काही शाळा, महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जात आहे. विद्यार्थ्यांनी पैसे भरायचे कसे, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. शुल्कासंदर्भात १५६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याच्या पावत्याही जोडल्या आहेत. ​दुष्काळामुळे शेतकरी व कष्टकरी पालकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना, महाविद्यालयांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शुल्क आकारणीवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. योगेश कळमकर, रिया मगरे, सचिन मार्कंड, राजरत्न जगताप, रोशन लोंढे, अरबाज शेख, शिखा यादव, प्रांजल हिरे, हर्षिता महाले, मनीष व्हडगर, रोशन माळी, वसीम पिंजारी, आतिफ खान, आसिफ शेख, मयूर सूर्यवंशी, सुमीत डामरे व गणेश बगाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SCROLL FOR NEXT