नाशिक

मालेगावमध्ये साकारणार शहीद स्मारक

CD
३६-३ मालेगावमध्ये साकारणार शहीद स्मारक जिल्हा नियोजनामधून निधी; ओझरखेडला क्रांतिसूर्य बिरसा मुंडांचा पुतळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ ः जिल्हा प्रशासनातर्फे मालेगाव येथे शहीद स्मारक साकारण्यात येणार असून ओझरखेड धरण येथे पर्यटन सुविधा विकासासह स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी चार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.६) पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकार व जागतिक बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महास्ट्राईड कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याला आठ कोटींचे पारितोषिक मिळाले आहे. या निधीपैकी चार कोटींतून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगावला शहीद स्मारक उभे करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. या स्मारकात ३८ शहीद जवानांच्या प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ओझरखेड धरण हे जिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जिल्हा नियोजनातंर्गत ४ कोटींतून धरण परिसरात पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात येतील. बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचा आणि आदिवासी समाजाच्या हक्क व प्रतिष्ठेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा हा सन्मान असेल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेचा ताबा तसेच स्थळ मंजुरी मिळाल्यावर काम सुरु होईल. सदर कामांची अंमलबजावणी पालखेड पाटबंधारे विभागावर सोपविण्यात आली असून ऑगस्ट २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT