Malegaon Municipal Corporation latest marathi news esakal
नाशिक

Nashik News: महापालिका पदभरती, अमृत निविदा छाननी TCSला देण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका पदभरती व अमृत मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटारची निविदा छाननी प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस (टीसीएस) या संस्थेला देवू नये अशी मागणी मनपाचे माजी सभागृह नेते अस्लम अन्सारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

श्री. अन्सारी यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना या मागणीचे निवेदन पाठविले आहे. (malegaon Municipal Recruitment Amrit tender scrutiny opposed to TCS Nashik News)

मनपात ६८२ पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार कामाची ४९९ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

या निविदांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकने छाननीचे काम करण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे प्रलंबित छाननी प्रक्रिया व पदभरतीचे काम टीसीएस संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी या संस्थेचे अधिकारी, कर्मचारी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारात सापडले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी भरती प्रक्रियेत रॅकेट चालविणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर शंका निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत टीसीएसला हे काम देवू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने मनपास तसे आदेश द्यावेत असेही नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

Latest Marathi news Live Update: जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीचे ११ जण बिनविरोध

Shirur News : दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील रितेश धावडे यांची निवड

SCROLL FOR NEXT