Bribe Case News esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: 4 हजाराची लाच स्वीकारताना मालेगावला पोलिसाला अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : दारुबंदी कायद्यान्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई करण थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

या कारवाईमुळे येथील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (Malegaon police arrested while accepting bribe of 4 thousand Nashik Bribe Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुका पोलिसांकडून दारुबंदी कायद्यान्वये तक्रारदार यांच्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता पोलिस शिपाई थोरात याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयाची लाच मागितली.

या संदर्भात तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. तालुका पोलिस ठाण्याच्या दक्षिणेकडील पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना थोरात याला पकडण्यात आले.

त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

SCROLL FOR NEXT