Malegaon Crime Sakal
नाशिक

मालेगाव पोलिसांचा गुन्हेगारांना हिसका; १० तलवारींसह चौघांना अटक

प्रमोद सावंत

मालेगाव ( जि. नाशिक) : शहर व परिसरातील विविध गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. मालेगाव पोलिसांनी शहर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अवैध शस्त्रांची जप्ती करतानाच दोनशेपेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री रमजानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमीन मौलाना दर्ग्याच्या पाठीमागे शहर उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून सुमारे १३ हजार रुपये किमतीच्या दहा धारदार तलवारी जप्त केल्या. गेल्या आठवड्यात पोलिसांनी तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व सात जिवंत काडतूस जप्त केले होते. येथील वाढत्या गुन्हेगारी कारवाया जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्याने घेतल्या. स्थानिक पोलिसांना त्यांनी या कारवायांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाया करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार व समाजकंटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी मोहरम व विविध सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस खास लक्ष ठेवून आहेत. १० ऑगस्टला रात्री पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस हवालदार दिनेश पवार, पोलिस नाईक राकेश उबाळे, साजिद शेख, तुषार आहिरे, सचिन बेदाडे आदींनी आमीन मौलाना दर्ग्याच्या पाठीमागे छापा टाकून अबू तालिब मोहम्मद कुर्बान (वय २२), अन्सारी रिहान अहमद रियाजउद्दीन (वय १९, दोघे रा. रमजानपुरा), मोहम्मद साजिद युनूस खान (वय २०, रा. जैबुन्निसा मशीदसमोर), अब्दुल मुक्तार अब्दुल सत्तार (वय २५, रा. रोलेक्स सायजिंगसमोर) यांना अटक केली. संशयितांच्या ताब्यातून दहा धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. संशयितांनी या तलवारी विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्या होत्या. आहिर यांच्या तक्रारीवरून रमजानपुरा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT