MSRTC News esakal
नाशिक

Malegaon Shivpuran Katha : 7 दिवसात मालेगाव आगाराला 11 लाखाचा नफा!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथे झालेल्या पुण्य श्री शिवमहापुराण कथेला राज्यभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. कथेमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, यासह असंख्य जिल्ह्यातील भाविकांनी येथे हजेरी लावली. नागरिकांना जाण्या येण्यासाठी लालपरी सोयीची ठरल्याने आठवड्यात मालेगाव आगाराला ११ लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळाला. (Malegaon Shivpuran Katha 11 Lakh profit to Malegaon MSRTC Depot in 7 days nashik news)

मालेगाव येथे शिव महापुराण कथेला २३ डिसेंबरपासून सुरवात झाली होती. त्याअनुषंगाने येथील आगार व्यवस्थापकांनी भाविकांच्या सोयीसाठी २५ बसेस वाढविल्या होत्या. या बसेस धुळे, चाळीसगाव, मनमाड, शिर्डी, औरंगाबाद आदी मार्गावर धावत होत्या. येथील आगाराला रोज साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळत होते.

सात दिवसात येथील आगाराचा निव्वळ नफा अकरा लाख रुपये मिळाला आहे. सात दिवसात जादा बसेस २३ हजार किलो मीटरपेक्षा अधिक धावल्या. यातून लाखो प्रवाशांनी सुखरूप प्रवास केला. शिवपुराण कथेच्या शेवटच्या दिवशी येथील आगारात जनसागर उसळला होता.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

प्रवासी भाविकांसाठी अखेरच्या दिवशी धुळे, मनमाड, साक्री, दोंडाईचा, कळवण, येवला, लासलगाव, शिरपूर या आगारातून जादा बसेस मागविण्यात आल्या होत्या.

सुमारे २२५ बसेसमधून शिव भाविकांना प्रवास केला. धुळे, चाळीसगाव, नाशिक या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. येथील बसस्थानकात पहिल्यांदाच एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथील जनसमुदायाला सुखरूप घरी पोचविण्यासाठी आगारातील प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक आदींनी परिश्रम घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले. येथील आगाराने केलेल्या नियोजनाबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले.

"येथील आगारात पहिल्यांदा एवढी गर्दी उसळली होती. सर्व प्रवाशांना त्यांचा घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. प्रवाशांच्या नियोजनासाठी पालकमंत्री दादा भुसे व वरीष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले."

- किरण धनवटे, आगार व्यवस्थापक, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT