गुन्हे वृत्त
द्याने शिवारात
तरूणाची आत्महत्या
मालेगाव : तालुक्यातील द्याने शिवाातील रोहित समाधान चव्हाण (वय २४, रा. महादेव मंदिराजवळ, नदी किनारी) या तरुणाने गुरुवारी (ता. ५) दुपारी साडेतीनला राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यास प्रवीण सूर्यवंशी यांनी त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. दर्शिका यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
-----
खूनाचा प्रयत्न;
गुन्हा दाखल
मालेगाव : मुंबई-आग्रा महार्गावरील उपकार सिनेमागृहासमोर उड्डाणपुलावर जाणाऱ्या रस्त्यावर पिकअप चालक व इनोव्हाचालक (एएच ०४ इक्यु ७२१४) मुश्रीफ भतिजा (रा. मालेगाव) यांच्या गाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांची वाहने पोलिसांच्या अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढे उभ्या असलेल्या चारचाकीला (एमएच १५ केजी ०३४४) धडक दिली. ४ नोव्हेंबरला दुपारी साडेतीनला हा प्रकार घडला. अन्वर सबदर शहा (वय ३८, रा. मालेगाव) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात पिकअपचालक (नाव, गाव माहित नाही) व मुश्रीफ तसेच त्यांचे साथीदारांविरुद्ध खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
------
चारचाकी वाहनातून
नकली नोटा जप्त
मालेगाव : येथील मोसमपुल ते सटाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इंडियन बुटीक दुकानाच्या समोर पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून कार आणि नकली नोटा जप्त केल्या. राकेश ढुणकी चव्हाण (वय २७) व नौशदलाल प्रधान चव्हाण (वय २०, दोघे रा. अजनाळे, ता. जि. धुळे) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे. पोलिसांनी या दोघांकडून चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडिया असे लिहिलेल्या आणि भारतीय चलनातील ५०० व १०० रुपयांच्या नोट सारखी हुबेहुब दिसणाऱ्या नोटांचे बंडल, कार (एमएच ०४ एफआर २७७०), कोयता, मोबाईल असे ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
-----
वाहनाच्या धडकेत
एक ठार; एक जखमी
मालेगाव : सोयगाव भागातील शुभम नंदु वाघ व त्यांचा मित्र विजय पंडीत गायकवाड (वय २२, रा. सोयगाव) हे दुचाकीने (एमएच ४१ बीझेड ९७७०) बच्छाव सर्कल मार्गे मोसम पुलकडे येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअपने (एमएच ४१ ए यु ६६९६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अपघातात शुभम यांच्या डोक्यास, हातापायास गंभीर दुखापत झाली. तर विजय गायकवाड याच्या डोक्यास व चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. कलंत्री एजन्सी समोर हा प्रकार घडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.