Man died after mob brutally thrashed by two men on Ghoti Sinnar highway nashik suspected to be carrying beef  
नाशिक

Nashik Crime News : धक्कादायक! नाशिकात गोमांस नेल्याच्या संशयावरून मॉब लिंचिंग; एकाचा मृत्यू

रोहित कणसे

नाशिक : गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-घोटी महामार्गवर गंभीरवाडीजवळ मॉब लिंचिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गावरून वाहतुक करणाऱ्या दोघा जणांना १० ते १५ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीनंतर स्थानिक लोकांनी या दोघांना धामनगाव येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान यातील एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

अधिक माहिता अशी की, काही दिवसांपूर्वी कसारा घाट परिसरात देखील असाच प्रकार समोर आला होता, त्यानंतर आता रात्रीच्या वेळी घोटी सिन्नर महामार्गावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यावरून स्थानिकांनी ही गाडी अडवली.

त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्यानंतर त्या दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर बाजूलाच असणाऱ्या एसएनबीटी रुग्णालयात दाखल करण्यात, मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे, तसेच या घटनेत नेमकं काय घडलं याचा तपास देखील पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT