crime esakal
नाशिक

Nashik Crime News : जमीन खरेदी-विक्रीचे वादातून मालेगावला एकास मारहाण

पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन तरुणास लोखंडी शॉपअप व बेसबॉलच्या बॅटने सहा जणांनी मारहाण करून जबर जखमी करण्याचा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात मिर्झा गालीब रस्त्यावरील एम मार्ट सुपर मार्केटसमोर जमिनीचा व्यवहार व पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन तरुणास लोखंडी शॉपअप व बेसबॉलच्या बॅटने सहा जणांनी मारहाण करून जबर जखमी करण्याचा प्रकार घडला.

मंगळवारी (ता.१६) रात्री साडेबाराच्या सुमारस हा प्रकार घडला. (man was beaten up in Malegaon due to dispute over land purchase and sale nashik crime news)

शहरातील पूर्व भागात बनावट दस्ताऐवज, कागदपत्र करून खरेदी विक्रीत फसवणूक आदी प्रकारही वाढीस लागले आहेत. जमीन वादातून झालेल्या या हल्ल्यात इस्राईल शेख अल्लाउद्दीन ऊर्फ युसु (वय ४३, रा. गुलशनाबाद) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर शहरातील राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांच्यातील समर्थकांचे हे वाद असल्याचे बोलले जाते. त्यातच माजी आमदार आसिफ शेख यांच्या चुलत्याचे नाव या तक्रारीत गोवण्यात आल्याने श्री. शेख यांनी कठोर शब्दात टिका केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात शेख अकील हाजी दिसत नसताना त्यांचेही नाव जाणून बुजून तक्रारीत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

इस्त्राईल शेख अल्लाउद्दीन ऊर्फ युसु व वकार मास्टर (३५, रा. आझादनगर), गुड्डु (३०, रा. अब्बास नगर), अकिल हाजी (रा. मालेगाव) यांच्यात पैशांची देवाण घेवाण व जमिनीच्या व्यवहारावरुन वाद होते. अकील हाजी याने वकार व गुड्डु यांच्यासह अन्य तीन साथीदारांबरोबर संगनमत करून इस्त्राईलच्या दुचाकीला धक्का दिला.

इस्त्राईलने दुचाकी उभी केली असता त्याला लोखंडी शॉकअप व बेसबॉलच्या बॅटने दोन्ही पायावर मारहाण करुन जबर जखमी केले. त्याच्या जवळील पन्नास हजार रुपये रोख व मोबाईल काढून व कारने त्याला जमिनीवर खाली पाडले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT