Police Custody esakal
नाशिक

Nashik Crime News : मणियारला 4 दिवसांनी पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंदिरानगर परिसरातील रहिवासी गौरव व नेहा जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य संशयित युनूस मणियार याच्या अटकेनंतर न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर, यापूर्वीच अटकेत मयूर बैरागी याला न्यायालयाने रविवारी (ता. २५) न्यायालयीन कोठडी सुनावल्याने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. (Maniyar in police custody after 4 days Nashik Crime News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कर्जबाजारी नवविवाहित जोडप्याकडे सावकारी पद्धतीने रकमेच्या वसुलीसाठी वारंवार धमकी देऊन तगादा लावणाऱ्या दोघा मुख्य संशयितांना दोन दिवसांच्या अंतराने इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. मृत गौरव जगताप व त्याची पत्नी नेहा जगताप यांनी डायरीत लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे इंदिरानगर पोलिसांनी संशयित युनूस मणियार व बैरागीला अटक केली आहे.

गौरव जितेंद्र जगताप (२९) याच्यासह पत्नी नेहा गौरव जगताप (२३) यांनी गेल्या १८ तारखेला घरातील हॉलमध्ये दोरीचा फास बनवून संगनमताने गळफास घेतला होता. या प्रकरणी बुधवार (ता.२१) मयूर बैरागी यास पोलिसांनी सातपुरमधील घरातून अटक केली होती. तर, शनिवार (ता.२४ ) दुपारच्या सुमारास वडाळागाव रस्त्यावर सापळा रचून संशयित मणियार (३५, रा. भारतनगर, वडाळारोड) यास अटक केली. मणियारला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने पोलिसांना मणियारकडे सखोल तपास करण्यास वेळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT