manmad railway station Sakal
नाशिक

मनमाड रेल्वे स्थानकाची कसून तपासणी; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त

अमोल खरे


मनमाड (जि. नाशिक) : देशातील मध्यवर्ती रेल्वे जंक्शन व सतत प्रवाशी आणि गाड्यांची वाहतूक वर्दळ असणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकाची गुरूवारी (ता. १६) नाशिक ग्रामीणच्या मालेगाव येथील बॉम्ब शोधक पथकातील ‘अॅना’ या श्‍वानाने कसून तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकाची सतत कसून तपासणी केली जात आहे. तर रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती लोहमार्ग निरिक्षक शरद जोगदंड यांनी दिली. ञ


मनमाड लोहमार्ग पोलिसांतर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक बंद असलेल्या रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. निर्बंध शिथील झाल्याने प्रवासी संख्या वाढू लागली. तसेच, गणेशोत्सव आणि रविवारी होणारा गणेश विसर्जण सोहळा बघता देशात घातपाताचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे महत्वाच्या रेल्वे स्थानकात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव ग्रामीणच्या बीडीएस पथकातील अॅना या श्‍वानाची रेल्वे स्थानकात एंन्ट्री होताच प्रवाशांना धडकी भरली.

अॅनाने रेल्वे स्थानकातील सर्व फलाटावरील प्रवासी सामान, रेल्वेची विविध कार्यलये, द्वितीय श्रेणी विश्रांती गृह, नवा पादचारी पूल, पार्सल कार्यालय, तिकीट बुकिंग आदी परिसराची कसून तपासणी केली. त्यानुसार सबकुछ ओके असल्याचा निर्वाळा दिला. लोहमार्ग पोलिस निरिक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक मधुकर लोखंडे, राजेंद्र पाटील, एन. एस. कातोरे, महेंद्र पाटील, संतोष मार्कड, नितीन मानकर, एस. डी. भोरकड, एस. एस. दांडगे, जी. पी. आहिरे, बी. एम. साबळे, एस. सी. आठवले आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT