नाशिक / इंदिरानगर : मन्ना गांगुर्डे हा सराईत इंदिरानगर पोलिसांना अनेक गुन्ह्यांत सामील आहे. जेल रोडला वास्तव्याला असलेल्या आणि इंदिरानगरला भररस्त्यात शिवीगाळ, हाणामारीच्या घटना घडूनही कायमच शहरातील तडीपारांचा राबता असलेल्या या संशयितावरील उपनगर पोलिसांची मेहेरनजर कायमच चर्चेत असायची.
अखेर सराईत मन्ना गांगुर्डे पोलिसांना सापडला
मन्ना गांगुर्डे हा सराईत इंदिरानगर पोलिसांना अनेक गुन्ह्यांत सामील आहे. जेल रोडला वास्तव्याला असलेल्या आणि इंदिरानगरला भररस्त्यात शिवीगाळ, हाणामारीच्या घटना घडूनही कायमच शहरातील तडीपारांचा राबता असलेल्या या संशयितावरील उपनगर पोलिसांची मेहेरनजर कायमच चर्चेत असायची. संशयित मन्नाने सातपूर, इंदिरानगरसह अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारनामे केले आहेत. काही महिन्यांपासून त्याने जेल रोडला मंगलमूर्तीनगर भागात बस्तान बसविले आहे. पोलिसांच्या लेखी मात्र कायमच फरारीच असणाऱ्या मन्नाच्या अनेक फरारी हद्दपार गुन्हेगारांचा आश्रयाच्या निमित्ताने कायमच जेल रोड भागात चर्चा रंगायच्या. मात्र त्याच्या घरात ना कधी पोलिस छापे टाकायचे की ना कधी तो पकडला जायचा. मात्र, आज अखेर एकदाचे पोलिसांनी मन्ना याला अटक केल्याचे जाहीर केले.
पोलिस आल्याची चाहुल लागल्यानंतर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत मन्ना ऊर्फ गोविंदा भारत गांगुर्डे (वय 33, रा. फ्लॅट नं. 9 , निसर्ग गोविंद सोसायटी, मंगलमूर्तीनगर, उपनगर) हा अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. आज वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर व सहाय्यक निरीक्षक राकेश भामरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत गांगुर्डे हा उपनगर नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने उपनगर नाक्यावर सापळा रचण्यात आला. दुपारच्या सुमारास गांगुर्डे तेथे आला. पण पोलिस आल्याची चाहुल लागल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.
एकदाची अटक केली.
जेल रोडला मंगलमूर्तीनगर चौकात उजळ माथ्याने फिरणारा, कायम कुरापती काढणारा; पण कायमच पोलिसांच्या दप्तरी मात्र नेहमीच फरारी असणारा विविध पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सराईत मन्ना ऊर्फ गोविंद भारत गांगुर्डे (वय 33, निसर्ग गोविंद सोसायटी, मंगलमूर्तीनगर, जेल रोड) याला अखेर पोलिसांनी एकदाची अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.