sarva 123.jpg
sarva 123.jpg 
नाशिक

"कोरोनाने रोजगार हिरावला..आता ओंब्यांतून दाणे काढून भरतोय पोट"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या अंमलबजावणीस १३ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. या आजाराने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. व्यावसायिक आणि हातावर काम करणार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

ओंब्यांतून दाणे काढून आपल्या पोटापाण्याची सोय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे आठ दिवसांपासून गावासह परिसरातील सर्वच दुकाने आणि काम बंद असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने गव्हासह इतर सर्वच पिकं बहरून आले. चांदोरीसह परिसरात गव्हाचे पीक दमदार झाले. पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी हाताने सोंगणी केली जात असल्याने रोजगार ही मिळत होता आणि जनावरांना भुसाही. सध्या यंत्राच्या वापर सुरू झाल्याने आणि मजूरही मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी हे हार्वेस्टरच्या साहाय्याने सोंगणी करतात. हे करतानाच काही गव्हाच्या ओंब्या खाली पडतात ज्याला सरवा म्हटलं जातं. कधी - कधी शेतकरी सरवा वेचतात तर काही शेतकरी तसाच ठेवून गुरे बांधतात तर काही जाळून टाकतात. मात्र मजूर लोक हाच सरवा वेचून, त्या ओंब्यांतून दाणे काढून आपल्या पोटापाण्याची सोय करताना दिसत आहेत. 

शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड

कोरोनामुळे देशातील सर्वच आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा शेतकऱ्यांवर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने नुकसान सोसून उभं राहणाऱ्या शेतकऱ्याचं कोरोनाने कंबरडंच मोडून टाकलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT