maratha morcha esakal
नाशिक

कोल्हापूरात मराठा मोर्चाचा एल्गार; हजारो नाशिककर होणार सहभागी

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. कोल्हापूरच्या पहिल्या एल्गार मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होतील, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maratha- -Kranti-Morcha-Kolhapur-Thousands-Nashik-residents-will-participate)

जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक झाली. बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलनाच्या नियोजनावर विचारविनिमय झाला. गाव, तालुकानिहाय समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर कोणीही वैयक्तिक टीका केल्यास त्याला जशास तसे उत्तर समाजाकडून देण्यात येईल. मग ती व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो. राजेंवर वैयक्तिक टीका करणे म्हणजे समाजावर टीका करणे, असे समजले जाईल, असा सामूहिक ठराव करण्यात आला. नाशिककरांवर कोल्हापूरकरांतर्फे जबाबदारी दिली जाईल, ती पूर्ण ताकदीनिशी पूर्ण करण्याचेही ठरविले आले.

दोन्ही सरकारांनी योग्य समन्वय साधून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात,

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य शासनाकडे मराठा समाजाबाबत अग्रगण्य पाच मागण्या केल्या आहेत. शासनाने अजूनही त्यावर ठोस भूमिका किंवा निर्णय घेतलेले नाहीत. या पाचही मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, यासाठी मराठा समाज आग्रही भूमिका घेणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य व केंद्र सरकारने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात व दोन्ही सरकारांनी योग्य समन्वय साधून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असा सूर बैठकीत व्यक्त झाला. करण गायकर, ॲड. शिवाजी सहाणे, राजू देसले, गणेश कदम, शरद तुंगार, योगेश कापसे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शरद शिंदे, अमित नडगे, विलास जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सचिन पाटील, तुषार भोसले, श्री. गुंजाळ, राहुल पाटील, सुनील बोराडे, मच्छिंद्र खुळे, श्याम खांडबहाले, विजय पाटील, भरत पाटील, काजल गुंजाळ, संदीप पवार, अतिश जाधव, भूषण तनपुरे व समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT