Maratha Reservation Kunbi Nondi esakal
नाशिक

Maratha Reservation: 2 हजार 483 कुणबी जातीच्या नोंदी! दिंंडोरीत तालुक्यातील 154 शाळांमध्ये तपासणी

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. आंदोलनाच्या धसक्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. शाळांमध्ये असणाऱ्या नमुना क्रमांक एकमधील प्रशासकीय नोंदी तपासणीचे आदेश शाळा स्तरावर दिले होते.

यात दिंडोरी तालुक्यात एकूण १३९८९६ नोंदी तपासण्या आल्या. एकूण २ दोन हजार ४८३ कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी दिली. (Maratha Reservation 2 thousand 483 records of Kunbi caste Inspection of 154 schools in dindori Taluka nashik)

मराठा, हिंदू- कुणबी नोंद असल्याबाबत अभिलेखे तपासणी मोहीम राज्यात सुरू आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांनी केंद्रप्रमुखांकडे सर्व माहिती भरून जमा करावी.

काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक शाळेतील नमुना क्रमांक एक तपासण्याचे आदेश दिले होते.

दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असताना, प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तत्काळ शाळेवर बोलावून शिक्षकांकडून नोंदी तपासणी करून घेण्यात आल्या. दिंडोरी तालुक्यातील शाळा स्तरावरून कुणबी नोंदी तपासण्यात आल्या.

त्यात १९६७ पूर्वीच्या एकूण १६६ शाळांपैकी १५४ शाळांमध्ये १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण ८५०३९ इतक्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकूण १२ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. १९४८ पूर्वीच्या कालावधीत एकूण ५४८५७ नोंदी तपासण्यात आल्या.

त्यात दोन हजार ४७१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. असे एकूण १३९८९६ नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी २, ४८३ कुणबी जातीच्या नोंदी दिंडोरी तालुक्यात आढळून आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT