नाशिक

जिल्हाध्यक्षपदी रणजीतराजे भोसले

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 34111 धुळे : मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रणजीतराजे भोसले यांचा सत्कार करताना सुधाकर बेंद्रे. शेजारी पदाधिकारी. -- मराठा क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भोसले -- समाजाच्या एकजुटीसह पंचसूत्रीवर काम करण्याचा निर्धार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : मराठा सेवा संघाच्या कार्यालयात समस्त मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची बैठक नुकतीच झाली. बैठकीत रणजीतराजे भोसले यांची मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समाजाचे मार्गदर्शक सुधाकर बेंद्रे यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. बैठकीत मराठा समाजाचे संघटन मजबूत करणे, मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, तसेच समाजातील प्रतिभावंत व्यक्तींना प्रोत्साहन देणे या पंचसूत्रीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत मराठा एकजुटीचा निर्णय घेतला. - मराठा, कुणबी, पाटील, देशमुख असे भेद विसरून एकदिल्याने काम करून हे संघटन सर्वसामान्य मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे ठरले. आगामी काळात ज्येष्ठ व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भोसले यांनी दिली. तसेच, आगामी बैठकीत कोअर कमिटी स्थापन करण्याचे निश्चित केले. बैठकीस श्री. बेंद्रे, श्री. भोसले, राजेंद्र काळे, राजेंद्र इंगळे, नाना कदम, अर्जुन पाटील, प्रफुल माने, अमर फरताडे, घनश्याम निरगुडे, हेमंत भडक, सुनील ठाणगे, नैनेश साळुंखे, पवन मराठे, अमोल मराठे, अमित भोसले, सुभाष पाटील, मनोज ढवळे, भरत काळे, विक्रम काळे, जितू पाटील, वामन मोहिते, संदीप पाटील, वैभव पाटील, भूषण पाटील, मयूर शिंदे, सुनील अहिरराव, देवेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, संदीप भदाणे, मनीष दहिते, नितेश साळुंखे, मुकेश खैरनार, सत्यविजय साळुंखे, सागर बोरसे, गणेश पाटील, प्रेम पाटील, रोहित पाटील, अभिजित बोरसे, उमेश देवरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२ व्या आरोपीला बेड्या; हरियाणामधून अटक केलेल्या अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

SCROLL FOR NEXT