नाशिक

६१ वर्षांच्या आठवणींना उजाळा; १०१ वर्षीय माजी विद्यार्थ्याची उपस्थिती ठरली स्नेहमेळाव्याचे आकर्षण लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसोहळा; जुन्या आठवणींनी भारावले माजी विद्यार्थी

CD
पान दोन ----------------- 07527 सटाणा : माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीत सहभागी डॉ.प्रसाद सोनवणे, शालनताई सोनवणे, किशोर कदम, मुख्याध्यापिका जे.बी.देवरे, डॉ.विलास बच्छाव आदींसह सर्व माजी विद्यार्थी. लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा विद्यालयात स्नेहमेळावा ६१ वर्षांच्या आठवणींना उजाळा; १०१ वर्षाचे माजी विद्यार्थी उपस्थित सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १८ : काळ पुढे सरकला, पिढ्या बदलल्या, आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या दिशांनी वळल्या; मात्र ज्या शाळेने आयुष्याला आकार दिला, त्या शाळेशी जोडलेली नाळ आजही तितकीच घट्ट असल्याचा भावनिक प्रत्यय येथील मविप्र संचलित लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात आला. तब्बल १९६५ पासूनचे माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी एकत्र आले होते. वयाची १०१ वर्षे पूर्ण केलेले माजी विद्यार्थी शिवाजीराव दगडू पाटील यांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधले. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात परिपाठासाठी उभे राहताना माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बालपणाचा आनंद ओसंडून वाहत होता. सी. डी. सोनवणे यांनी परिपाठ व कवायत घेतली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गांना भेट देत बाकांशी, वर्गखोल्यांशी आणि आठवणींशी पुन्हा नाते जोडले. बाबाज मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे तर शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील, मविप्र संचालिका शालन सोनवणे, निवृत्त शिक्षक एस. आर. फेगडे, डी. डी. शिंदे, निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नितीन ठाकरे, डॉ. विलास बच्छाव, डी. एस. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहमेळावा अध्यक्ष किशोर कदम व मुख्याध्यापिका जे.बी. देवरे यांनी स्वागत करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. विलास बच्छाव, दिलीप सोनवणे, बापू अमृतकार, माजी प्राचार्य डी. डी. शिंदे, जिभाऊ सोनवणे, विलास दंडगव्हाळ, दिलीप चव्हाण, कमल भांगडिया, ॲड. नितीन चंद्रात्रे, विठ्ठल सोनवणे, जगदीश अमृतकर, केशव शिंदे, चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगतातून जुन्या आठवणी जागवल्या. प्रताप दिघावकर यांनी सटाणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपयांची पुस्तके भेट देण्याची घोषणा करताना मराठा हायस्कूलचा माजी विद्यार्थी हीच माझी ओळख असून, माझ्या जडणघडणीत शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. डॉ. प्रसाद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अनिल पाटील यांनी आभार मानले.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT