(ही बातमी शहर व जिल्हा टुडेत घ्यावी)
फोटो - NSK26H34450
आगासखिंड : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ. सी. के. पाटील, डॉ. संजय बागुल, प्रा. व्ही. ए. सोनवणे, प्रा. ऋषिकेश बरकले व विद्यार्थी.
मराठी अभिजात भाषा दिन
‘शताब्दी’मध्ये उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आगासखिंड, ता.४ : येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मराठी भाषेचा गौरव, तिची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने मराठी अभिजात भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा निर्माण करण्याबरोबरच भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ. प्रीतम वीर, विश्वस्त डॉ. स्नेहा वीर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. के. पाटील, प्राचार्य डॉ. संजय जे. बागुल, प्रा. व्ही. ए. सोनवणे आणि प्रा. ऋषिकेश बरकले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी मराठी भाषेची प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्य, संत साहित्याचे योगदान, मराठी भाषेतील वैचारिक संपन्नता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील तिचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पोस्टर मेकिंग स्पर्धा, मराठी भाषेच्या महत्त्वावर आधारित भाषणे आणि कविता वाचन हे उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून पोस्टर साकारत मराठी भाषेचे सौंदर्य, साहित्यिक वैभव आणि संवर्धनाची गरज प्रभावीपणे मांडली. प्रा. एम. डी. वाघ आणि प्रा. व्ही. एस. दळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.