नाशिक

नंदुरबारात आज नांदी साहित्य संमेलन

CD
नांदी साहित्य संमेलनात होणार बोलीभाषांचा जागर आज उद्‌घाटन : परिसंवाद, कवी संमेलनाचे आयोजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : शहरातील कन्यादान मंगल कार्यालयाच्या कै. शालिनीताई नटावदकर नगरीत आयोजित जिल्हा नांदी साहित्य संमेलन आज (ता. ४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित राहणार आहेत. कार्याध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तानसेन जगताप, कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, प्राचार्य संजीव गिरासे, डॉ. वासुदेव वले आणि गणेश आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साहित्य सोहळा पार पडणार आहे. संयोजन समितीच्या प्रमुखपदी रोहन नटावदकर, तर सहसंयोजकपदी ऋषिका गावित यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गौरीशंकर धुमाळ, श्रीराम दाऊतखाने, सुलभा महिरे, अजित लांडगे, प्रशांत बागूल, मंगेश उपासणी, ॲड. राहुल कुळकर्णी, राहुल खेडकर, तारकेश्वर पटेल, भानुदास शास्त्री, कल्याणी डांगे आणि डॉ. पुष्कर शास्त्री यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक पार पडली. श्री जी सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य भारती, नंदुरबार शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लोककलावंत, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT