sahitya sammelan esakal
नाशिक

साहित्य संमेलनावर 'ओमिक्रॉनचे' सावट; पाळावे लागणार 'हे' नियम

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan) 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे (omicron) सावट आलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच काही नियमही पाळावे लागणार आहेत. वाचा सविस्तर..

पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद , बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज , युट्यूब चॅनल आणि वेबसाईट वर लाईव्ह बघायला मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यात पाचशेच्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत. सिन्नर, निफाड तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात कोणीही कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मग हे नियम पालन साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राज्य भरातून आलेल्या लोकांंना करायला लावणे शक्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूवर फक्त एकावर एक दोन मास्क घालणे, लसीकरण हाच पर्याय उपलब्ध आहे. साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी निमंत्रक करणार का आणि करायची झाल्यास तितकी सुविधा उपलब्ध आहे का, असा प्रश्न आहे. अनेक व्यासपीठासमोर साहित्य संमेलनाचे कार्यक्रम होणार. त्यात भोजनावळी वेगळ्याच. हे पाहता ही गर्दी कशी रोखायची, असा प्रश्न आयोजकांसमोर असेल. त्यात नव्या विषाणूचे सावट. आता नियमबदल करून सरकारने संमेलन रद्द करण्याची घोषणा होणार की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT