नाशिक

पहिले मुख्यमंत्री आणि नाशिकची दिलदारी; विश्वास पाटलांनी सांगितला किस्सा

सकाळ वृत्तसेवा

खऱ्या अर्थी यारी आणि दिलदारी ही नाशिककरांकडून शिकायला हवी असं विश्वास पाटील म्हणाले.

नाशिक - मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.

काळाराम मंदिर सत्याग्रह, दादासाहेब गायकवाड यांचे कार्य या नाशिक नगरीत होत. नाशिक या भूमीत अनेक महत्वाचे व्यक्तिमत्व घडले असल्याने या भूमीला विशेष महत्व आहे. यारी आणि दिलदारी यात नाशिकचा हात कोणी धरू शकत नाही. राजकीय दृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची भूमी आहे हे सांगताना त्यांनी पहिल्या मुख्यमंत्रीपदावेळचा किस्सा सांगितली. ते म्हणाले की,नव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? भाऊसाहेब हिरे की यशवंतराव चव्हाण? यांच्यात थोडक्यात हिरे यांची संधी हुकली, चव्हाण साहेबांचं कर्तृत्व असं की चव्हाण साहेबांनी हिमालयाला थक्क करेल असं कर्तृत्व दिल्लीला दाखवलं. तेव्हा हेच नाशिक पुढे झालं आणि नाशिकहून यशवंतराव चव्हाणांना निवडून दिलं होतं. खऱ्या अर्थी यारी आणि दिलदारी ही नाशिककरांकडून शिकायला हवी असं विश्वास पाटील म्हणाले.

साहित्याच्या दृष्टीकोनातून रत्नाची खाण आहे. नाशिकमध्ये साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे. कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रसाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन घ्यावे की नाही यावर प्रत्येक वर्षी प्रश्न उपस्थित केले जातात. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय पक्षांच्या नावावर, भोंदू बाबांच्या नावावर जर लोक एकत्र येत असतील तर मराठी भाषेसाठी एकत्र आले तर काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळी विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

SCROLL FOR NEXT