नाशिक

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन

CD
फोटो : NSK26H34707 नंदुरबार : रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन करताना बाल कलाकार तनिष्कार पेंढारकर. शेजारी रमाकांत पाटील, प्रा. डॉ. माधव कदम, नागसेन पेंढारकर, राजेश जाधव, मनोज सोनार. ------------ मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : मराठी रंगभूमी दिनानिमित्त जिभाऊ करंडक परिवार, बालरंगभूमी परिषद व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन व रंगमंच पूजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाप्रसंगी राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीत अभिनयात रौप्य पदक प्राप्त केलेल्या तनिष्का नागसेन पेंढारकर या बाल कलावंताच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक रमाकांत पाटील, प्रा. डॉ. माधव कदम, बालरंगभूमी परिषद मुंबईचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष नागसेन पेंढारकर, बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह राजेश जाधव, कार्याध्यक्ष मनोज सोनार आदी उपस्थित होते. या वेळी रमाकांत पाटील, प्रा. डॉ. माधव कदम, नाट्यकर्मी क्षमा वासे- वसईकर आदींनी मत व्यक्त केले. ज्येष्ठ कलावंत प्रकाश मच्छले यांनी गीत सादर केले. तर भास्कर धनगर यांनी कविता सादर केली. या वेळी नाट्यकर्मी राहुल खेडकर, विजय पाटील, अभिनेता विजय पवार, संतोष पाटील, तुषार ठाकरे, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव महेश रघुवंशी, गिरीश वसावे, तुषार सोनवणे, कुणाल वसईकर, प्रफुल महिरे, हेमंत पेंढारकर, मनोज शेवाळे, दिनेश पाठक, पार्थ जाधव, धर्मेंद्र भारती, प्रदीप जोशी, किरण दाभाडे, ऋषिकेश मंडलिक, योगेश पाटील, मानसिंग राजपूत, कुणाल वीर, कन्हैया सोनवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी केले. राजेश जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT