नाशिक

भुसावळला मराठी रंगभुमी दिनानिमित्त परीसंवाद उत्साहात

CD
मेनफिचर --------- (फोटो तीन कॉलम वापरावा) BSW26B12209 भुसावळ : मराठी रंगभूमीदिनानिमित्त आयोजित परिसंवादात विचार व्यक्त करताना वीरेंद्र पाटील. सोबत मोहन पालक, डॉ. विकास कोळंबे, मनोहर जाधवांनी, चंद्रकांत चौधरी व अनिल कोष्टी. ------------ समृद्ध परंपरा नव्या पिढीने जपणे आवश्यक ------- मराठी रंगभूमी दिनानिमित्त भुसावळच्या परिसंवादात ज्येष्ठ रंगकर्मींचा परिसंवाद सकाळ वृत्तसेवा, भुसावळ, ता. ६ : येथे मराठी रंगभूमीदिनानिमित्त ''शहरातील प्रायोगिक हौशी नाट्य चळवळी पुढील आव्हाने'' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी नाटकांची समृद्ध परंपरा नव्या पिढीने जपणे आवश्यक आहे, असा सूर उमटला. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक होते. शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात झालेल्या या परिसंवादाचे आयोजन भुसावळमधील सर्व नाट्य संस्था व कलावंत यांनी एकत्रितरित्या केले होते. परिसंवादात स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, नाट्य रसिक मनोहर जाधवानी, आनंद सपकाळे यांनी सहभाग घेऊन स्थानिक पातळीवर नाट्य चळवळीमधील समस्यांवर प्रकाश टाकला. नवीन पिढीने नाटक माध्यमाकडे सकारात्मकदृष्टीने बघून सर्व अडचणींवर मात करून आपल्या मराठी नाटकांची समृद्ध परंपरा जपणे आवश्यक आहे, असा आशावादी सूर परिसंवादातील सर्व वक्त्यांच्या भाषणांमधून व्यक्त झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, डॉ. विकास कोळंबे यांची विशेष उपस्थिती होती. रंगकर्मी कुंदन तावडे यांनी नांदीचे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठस्तरावर झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कला प्रकारात विजेत्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुशील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सपकाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कलाविष्कारचे सचिव धर्मराज देवकर, प्रबोध भावे, राजेंद्र जावळे, कुंदन तावडे, उमेश गोरधे, हारून उस्मानी, मनोहर झांबरे, युवराज कुरकुरे, नारायण माळी, धनराज कुवर, रवींद्र कोळी, चेतन चौधरी, रिया कोल्हे, वैष्णवी बाविस्कर, प्रेरणा देशमुख व नाट्य रसिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?

Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

Gangapur News: एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे विहिरीत पाण्याचा अखंड झरा! गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्दमध्ये कुतूहल, पाहण्यासाठी गर्दी

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

SCROLL FOR NEXT