Marigold
Marigold  esakal
नाशिक

Dasara 2023: विजयादशमीला झेंडूची आवक वाढल्याने भाव घसरले

सकाळ वृत्तसेवा

Dasara 2023 : विजयादशमी पार्श्वभूमीवर झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर असून, जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातूनही विक्रेते, व्यापारी दाखल झाल्याने भाव घसरले असल्याची स्थिती आहे.

विजयादशमीला पूजेसह हार बनविण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सोमवारी (ता. २३) सकाळपासूनच गंगाघाट, गौरीपंटागणावर व्यापारी, विक्रेत्यांनी गर्दी केली होती. (Marigold prices drop on Vijayadashami due to increased arrivals nashik)

यंदा पावसाने दडी मारल्याने तसेच, अवेळी पडलेल्या पावसामुळे अळी पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला असून भाव घसरले आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांना भाव कमी असल्याची स्थिती आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगावसह नाशिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, निफाड, दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फूल विक्रीसाठी आणल्याने आवक मोठी आहे.

असे आहे दर

झेंडूची फुले : ५० ते ७० रुपये शेकडा

एक क्रेट : २०० रुपये

हार : लहान- ४०, मोठे हार- ७० ते शंभर रुपये

शेवंती फुले : १०० रुपये किलो

"विजयादशमीला झेंडूच्या फुलांना मोठी आवक आहे. झेंडूची फुले ५० रुपये शेकड्याने विकली जात असून दोनशे रुपये क्रेटचा भाव आहे. शेवंतीची फुले शंभर रुपये किलोने विक्री होत आहे."

- रघुनाथ लहाने, शेतकरी, मोहमुख (ता. कळवण)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT