A rush of Muslim brothers to a clothing store to buy baby clothes. esakal
नाशिक

Ramzan Eid Festival : ‘रमजान ईद’च्या खरेदीने बाजारपेठ गजबजली!

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Eid Festival : रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. रविवार सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधत कापड बाजारात खरेदीसाठी गर्दी बघावयास मिळाली. (market buzzing with shopping of Ramadan Eid festival nashik news)

मुस्लिम बांधवांकडून विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. ईद निमित्त आवश्यक विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे.

रविवारी (ता.९) सुट्टी असल्याने भद्रकाली कापड बाजार, मेनरोड, दहीपूल, शालिमार, नेपाळी कॉर्नर, दूध बाजार भागात कपडे, पादत्राणे, घरातील साहित्य, शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारची खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे बघायला मिळाली. विशेष करून कपड्यांच्या दुकानात महिला, चिमुकल्यांच्या कपड्यांना अधिक मागणी होत आहे.

ऑनलाइन खरेदीस वाढता प्रतिसाद

आकर्षक ड्रेस मटेरियल, रेडीमेड कपडे अतिशय मुबलक दरात घरपोच मिळत असल्याने नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे खरेदी विक्रीसाठी सोशल मीडियाचा देखील वापर होत असल्याने दिवसेंदिवस ऑनलाइन खरेदीस प्रतिसाद वाढत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

चिमुकल्यांच्या कपड्यांना अधिक मागणी

रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत व्यावसायिकांनी नवनवीन पॅटर्न विक्रीसाठी आणले आहे. चिमुकल्यांना बाजारात असलेला नवीन पॅटर्न भूरळ पाडत आहे. विक्रेते देखील चिमुकल्यांचे विविध डिझाईन, आकर्षक कपड्यांची मागणी पूर्ण करीत आहे.

महिलांनीही बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसत आहे. महिलांसाठी ड्रेस मटेरियलचे विविध पॅटर्न विक्रीसाठी दाखल झाले आहे. रविवारचा दिवस असल्याने गर्दी वाढली असली तरी ही गर्दी रमजान ईदपर्यंत कायम असेल असा विश्वास व्यावसायिक व्यक्त करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT