Former MLA Anil Kadam, Pramod Kute during meeting esakal
नाशिक

Market Committee Election : प्रभावी युक्तीवादानंतरही पिंपळगांवला 15 अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगांव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या बुधवारी (ता. ५) झालेल्या छाननीत विविध कारणांवरून १३ उमेदवारांचे १५ अर्ज बाद ठरविण्यात आले.

दरम्यान, बाद झालेल्या अर्जांवर या वेळी जोरदार युक्तीवाद झाला. मात्र, निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना पठारे यांनी अपात्रतेचा निकाल कायम ठेवल्याने आता २९४ अर्ज वैध ठरले आहेत. (Market Committee Election 15 applications rejected for Pimpalgaon despite effective arguments nashik news)

बाजार समिती सभागृहात झालेल्या अर्ज छाननीवेळी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नव्या सहा सोसायट्यांच्या अस्तित्वाच्या वादाची किनार अर्ज छाननीतही दिसली. नव्याने झालेल्या सहा सोसायट्यांच्या संचालकांनी सुचक व अनुमोदक म्हणुन स्वाक्षरी केलेले चार अर्ज बाद ठरविण्यात आले.

या निर्णयावर आमदार बनकर यांच्या वतीने प्रमोद कुटे यांनी प्रभावीपणे बाजु मांडली. अंतिम यादीत नावे कायम असताना व जिल्हा निबंधकांनी ती नावे अद्याप वगळुन नव्याने अंतिम यादी प्रसिद्ध केलेली नसल्याने संबंधीत संचालकांना सुचक-अनुमोदक म्हणुन ग्राह्य धरावे व हे चारही अर्ज मंजुर करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तर माजी आमदार कदम यांच्या गटाकडुनही त्यांच्या वकीलांनी प्रभावीपणे बाजु मांडताना, ‘ती’ नावे वगण्यात आल्याने चार उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचा निकाल कायम ठेवावा, असा मुद्दा मांडला. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, शोभा घोलप, ज्ञानेश्‍वर बागुल, प्रताप पवार, अनुपमा जाधव, सुभाष पवार यांच्यासह १३ जणांचे १५ अर्ज दहा गुंठे क्षेत्रासह विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले.

दरम्यान, अर्ज छाननीत कोणत्याच गटाने फारसे आक्षेप घेतले नाही. त्यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असली, तरी छाननीत मात्र सौहार्दाचे वातावरण दिसले. माजी आमदार श्री. कदम, सरपंच भास्करराव बनकर, दिलीप मोरे, प्रणव पवार, अमृता पवार, राजेश पाटील, आमदार बनकर गटाकडुन सुभाष होळकर, नंदु सांगळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT