election esakal
नाशिक

Market Committee Election : नव्या नियमांनी इच्छुकांच्या नाकीनऊ!

अनामत 5 हजार, खर्च लाख रुपये तर शेतकरी दाखला अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोणताही शेतकरी उमेदवारी करू शकणार आहे. मात्र तो कोणत्या गटातून, कोणत्या जागेवर अन किती संख्येने असे अनेक प्रश्न समजून घेताना इच्छुकांच्या नाकीनऊ येत आहे.

कागदपत्रे जमविण्यासाठी एकच धावपळ करावी लागत असून अनामत रक्कमही पाच हजार रुपये ठेवल्याने हौसे-नवश्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागणार आहे. विशेषतः नवीन निकष समजून घेताना अधिकाऱ्यांवरही नेते व इच्छुकांच्या प्रश्नांची सरबत्ती होत आहे. (Market Committee Election New rules for aspirants making trouble nashik news)

सोसायटी व ग्रामपंचायत गटातून कुठलाही शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहे. त्यासाठी या संस्थांचा सदस्य असलाच पाहिजे ही अट नाही मात्र या दोन्ही गटात सुमारे १५ च्या आसपास जागा असल्याने या १५ ही जागावर फक्त शेतकरीच निवडून येऊ शकतील का तसेच सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य असला तरी त्याला शेतकरी असल्याच्या दाखल्याची आवश्यकता आहे का ?

, एका गटात किती शेतकरी उभे राहू शकतील? असे गुंतागुंतीचे प्रश्न अनेक इच्छुकांना पडत आहेत. शेतकरी गटातून उमेदवारी करण्यासाठी चालू तारखेचा ८ ‘अ’ व सातबारा उतारा, शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असून गाव पातळीवर तलाठ्याकडून हे दाखले मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे.

१० गुंठे क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यास सोसायटी व ग्रामपंचायत या मतदारसंघातून उमेदवार होता येणार आहे. त्यामुळे फक्त शेतकरी असून उपयोग नाही तर १० गुंठे क्षेत्र नावावर असणे गरजेचे आहे.

शासकीय सेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा सेवक बाजार समिती साठी उमेदवारी करू शकणार नाही. तसेच २४ तासाच्या आत पैसे देण्यास कसूर केलेला व्यापारी, अडत्या देखील उमेदवारी करू शकणार नाही. ज्याच्या कुटुंबामध्ये परवानाधारक व्यापारी असेल असा शेतकरी देखील उमेदवारी करू शकणार नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मतदारयादीत असलेली व्यक्तीच शेतकरी उमेदवाराला सूचक व अनुमोदक होऊ शकणार आहे. आरक्षित राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यावेळी उमेदवारी अर्जाची किंमत २०० रुपये असून उमेदवाराला पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

राखीव जागेसाठी हजार रुपये अनामत रक्कम आहे. बाजार समितीची काही थकबाकी असल्यास कोणालाही उमेदवारी करता येणार नाही असे नियम असल्याने अनेक इच्छुक अर्ज दाखल करण्यापूर्वीच बाद झाले आहेत.

खर्चाची मर्यादा एक लाख

निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक खर्च करण्यास एक लाखांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे.याशिवाय १५ मार्च २०२३ च्या राजपत्रानुसार निवडणूक खर्चाचा उमेदवाराला स्वतंत्र हिशोब ठेवावा लागणार आहे.निवडणूक खर्चाच्या लेख्यासह पावत्याही सादर कराव्या लागतील.

ही कागदपत्रे आवश्यक

उमेदवारी अर्ज, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, तलाठी रहिवासी दाखला, राखीव प्रवर्गासाठी जात व जात वैधता प्रमाणपत्र, बाजार समितीचे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकांसाठी तहसीलदारांचे प्रमाणपत्र, शेतकरी गटासाठी शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ८ अ उतारा, स्वयंघोषणापत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT