Prospective Director expressing his happiness that the election of Income Market Committee was uncontested esakal
नाशिक

Market Committee Election: सुरगाणा बाजार समिती अखेर बिनविरोध! माकपप्रणित किसान विकास प्रगतीचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : निवडणूक रिंगणातून पाच उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे विरोधात कुणीही नसल्याने सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

जिल्ह्यात बिनविरोध निवडणूक होणारी सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली ठरली आहे. बाजार समितीवर माकप प्रणीत किसान विकास प्रगती पॅनेलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. (Market Committee Election Surgana Market Committee finally unopposed Dominance of Communist led Kisan Development Progress nashik news)

अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या दिवशी हिरामण गावित, इंद्रजित गावित, दौलत गावित, जनार्दन भोये या चार जणांनी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र दुसरीकडे बोरगावचे सरपंच अशोक गवळी यांनी ग्रामपंचायत गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता.

गवळी यांनी अर्ज मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध होईल, यासाठी सर्व मातब्बरांकडून तसे प्रयत्न सुरू होते. शेवटच्या क्षणापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि अशोक गवळी यांनी अर्ज मागे घेतला.

याआधीच किसान विकास पॅनेलचे सोसायटी गटातून चार, व्यापारी गटातून दोन तर ग्रामपंचायत गटातून एक याप्रमाणे सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आज माघारीच्या दिवशी सोसायटी गटातून चार व ग्रामपंचायत गटातून एक अशा पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे सर्व जागा बिनविरोध झाल्या.

बाजार समितीवर माकप प्रणीत किसान विकास प्रगती पॅनेलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. २८ एप्रिलला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाल्याने आता अधिकृत निकालाची औपचारिकता तेवढी बाकी राहिली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

गवळींच्या माघारीने मार्ग मोकळा

सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागा आहेत, मात्र १७ जागांवर निवडणूक होत आहे. संचालक मंडळ स्थापित झाल्यानंतर बाकी असलेल्या जागेसाठी अशोक गवळी यांना बिनविरोध निवडून देण्याचे आश्वासन इंद्रजित गावित, जनार्दन भोये, मोहनराव गांगुर्डे आदींनी दिले.

ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यात बिनविरोध निवडणूक पार पडल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे शासनाचा वेळ आणि खर्च देखील वाचला आहे.

गवळी यांनी माघार घेतली नसती तर तेवढ्या एका जागेसाठी निवडणूक यंत्रणेला कामाला लागावे लागले असते अशी चर्चा सुरू होती. सोसायटी गटातून हिरामण गावित, इंद्रजित गावित, जनार्दन भोये, दौलत गावित यांनी तर ग्रामपंचायत गटातून अशोक गवळी यांनी माघार घेतली.

बिनविरोध निवड झालेले संचालक

सोसायटी गट - उत्तम कडू, मोहनराव गांगुर्डे, सुभाष चौधरी, भरत पवार, सावळीराम पवार, तुळशीराम भोये, अशोक भोये, संजाबाई खंबाईत, पार्वतीबाई गावित, अब्बास शेख, अबूबकर शेख. ग्रामपंचायत गट ः पुंडलिक भोये, हिरामण गावित, भिका राठोड, भास्कर गावित.

व्यापारी गट : मोहन राऊत, गौतम पगारिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''टॉयलेट्सला कुलूपं, पाणी नाही, खाऊ गल्ल्या बंद.. फडणवीस साहेब त्रास देऊ नका'', जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबईत मुसळधार! अनेक भागात पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT