market in Igatpuri is crowded for Christmas shopping nashik marathi news 
नाशिक

नाताळसाठी इगतपुरीतील बाजारपेठ फुलली! घर सजावटीच्या वस्तूंना मागणी 

विजय पगारे

इगतपुरी (नाशिक) : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळासाठी शहरातील बाजारपेठ फुलली असून, ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. विविध भागातील दुकानांमध्ये आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

नाताळची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांमध्ये वस्तूंचे आकर्षक मांडणी करण्यात आली असून विशेषतः बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकडे दुकानदारांचा कल आहे. होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती सांताक्लॉजचे कपडे, चांदणी खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटे, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केकची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. शाळा बंद असल्या तरी सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या खरेदीकडे मुलांचा कल असून लाल आणि पांढर्‍या रंगसंगतीच्या सांताक्लॉजच्या पेहरावाला अधिक मागणी आहे. 

या वस्तूंची खरेदी 

घर आणि चर्चच्या सजावटीसाठी लागणार्‍या वस्तूंसह चांदणी बॉल्स, हँगिंग बेल्स, सांताक्लॉज कापडी आणि लाइट असलेली टोपी, ख्रिममस ट्री, प्रभू येशू आणि मेरी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील चर्च सजवण्यात येत असून यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

‘ही’ इच्छा पूर्ण झाली तर ३ कोटी लोकांना मदत करणार! लालबागच्या राजाच्या चरणी भक्ताची अनोखी इच्छा, चिठ्ठी सोशल मीडियावर Viral

IND vs JPN, Playing XI: जसप्रीत बुमराह संघाबाहेर, वैभव सूर्यवंशीला मिळाली का संधी? पावसामुळे किती ओव्हरची होणार मॅच?

Marathi News Live Updates : कार खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू

Anant Chaturdashi 2026: बाप्पाला निरोप देण्यापूर्वी 'हे' नियम अन् विधी नक्की जाणून घ्या; पाहा उत्तरपूजा आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त!

SCROLL FOR NEXT