Different colored Suttar Feni, Shevayi which has entered the market on the occasion of Ramadan. esakal
नाशिक

Ramzan Festival : रंगबिरंगी सुत्तर फेणीने रमजानची बाजारपेठ बहरली! प्रतिकिलो 400 रुपयांना विक्री

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रमजान पर्वात मुस्लिम बांधवांसह अन्य समाज बांधवांमध्ये सुत्तर फेणीचे विशेष आकर्षण असते. रमजान पर्वनिमित्त विविध रंगी सुत्तर फेणी बाजारात दाखल झाली आहे.

विविध वस्तूंना महागाईची झळ बसली असतानाही गत वर्षाच्या तुलनेत सुत्तर फेणीच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. (market of Ramzan Festival selling with colorful Suttar Feni Selling at Rs 400 per kg nashik news)

रमजान महिन्यातच सुत्तर फेणी विक्रीस बाजारात दाखल होते. चविष्ट असल्याने नागरिक आवर्जून खरेदी करतात. गुलाबी, हिरवी, पांढरी, चॉकलेटी, पिवळा अशा पाच रंगात सुत्तर फेणी विक्रीस उपलब्ध झाली आहे.

दिवसभर रोजा असताना गळ्यात कोरड भासू नये, तिखट जाणवू नये. यासाठी सुत्तर फेणी खरेदीस पसंती मिळते. याशिवाय तयार करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. गरम दुधामध्ये टाकून त्यात थोडी साखर मिसळून काही वेळातच गोड सुत्तर फेणीचा आस्वाद घेता येतो. सुत्तर फेणीपेक्षा हाताने तयार केलेल्या शेवयीचे दर अधिक असून सुमारे ४०० रुपये किलोने विक्री होत आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शेवयीचे प्रकार आणि दर

प्रकार दर

सुत्तर फेणी १५० किलो

हाताची शेवयी ४०० किलो

चुंबल १५० किलो

कटलेट १५० किलो

बनारसी १५० किलो

भुजलेली विना भुजलेली ४० ते ५० पाकीट

मालेगावमधून निर्यात

सुत्तर फेणीसह अन्य विविध प्रकारच्या शेवयी मालेगावमध्ये तयार होतात. राज्याच्या विविध शहरांमध्ये मालेगावातूनच निर्यात होते. अनेक कुटुंबीयांना त्यातून रोजगार उपलब्ध झाला असून विविध रंगात चविष्ट फेणीसह शेवयी तयार करण्यास मालेगाव नेहमी अग्रेसर राहिले आहे. अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

"सुत्तर फेणीसह विविध प्रकारच्या शेवयी खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही."- अफजल शेख, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : 'नकाशा दाखवा, मगच झाडाला हात लावा'; ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चार तास रस्ता रोखला!

Short-Term Career Course: करिअरला द्या नवे वळण! ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग तरुणांचे आवडते शॉर्ट टर्म कोर्स

Astrology Predictions 2026: ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला पंख फुटणार, गुरु ग्रह देईल यश, धन आणि शुभ फलांची भेट!

Latest Marathi Live News Update : गावठाणची जागा आदानी समूहाला दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ट्रस्टचा इशारा

Yeola Criem : येवला पोलिसांनी उद्ध्वस्त केले गांजा तस्करांचे रॅकेट; तब्बल ४ किलो गांजा जप्त, दोन आरोपींना अटक!

SCROLL FOR NEXT