Sky lanterns and stickers sold in the market on the occasion of Ram Mandir Pranpratistha ceremony. esakal
नाशिक

Nashik News : राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बाजारपेठ सजली; मूर्ती, स्टिकर विक्रीस दाखल

बाजारात राममंदिर आकाशकंदील, अयोध्येतील मंदिर आणि राममूर्ती तसेच इतर वस्तूचे स्टिकर दाखल झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा देशवासीयांसाठी दिवाळीपेक्षा कमी नाही. त्यानिमित्ताने सजावटीसाठी बाजारात राममंदिर आकाशकंदील, अयोध्येतील मंदिर आणि राममूर्ती तसेच इतर वस्तूचे स्टिकर दाखल झाले आहे.

नागरिकांकडूनही मागणी वाढली असल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात आले. (market was decorated for Ram Mandir Pran Pratishtha ceremony nashik news)

प्रभू श्रीराम १४ वर्षाचा वनवास कापून अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी मार्गावर दीप प्रज्वलित करण्यात आले होते. पौराणिक आकाशकंदील लावण्यात आले होते. संपूर्ण अयोध्यानगरी प्रकाशमय करण्यात आली होती. तो दिवस आजही दिवाळी म्हणूनच ओळखला जातो. या वर्षी जानेवारीतच दिवाळी साजरी होत आहे.

त्याचे कारण म्हणजे अयोध्येतील राममंदिर निर्माण होऊन प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रूपात श्रीरामाचे अयोध्येतील मंदिरात आगमन होणार आहे. हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही. म्हणूनच दिवाळीप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी विविध माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा सप्ताह साजरा केला जात आहे. घरोघरी, मंदिरांवर सजावट करण्यात येत आहे.

बाजारात दिवाळीप्रमाणेच राममंदिर प्रतिकृती प्रतिमा, प्रभू श्रीराम, रामायणातील अन्य दृश्य छापील आकाशकंदील बाजारात उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे प्रथमच राममंदिरसह परिसरातील विविध वास्तू, श्रीराम प्रतिमा, हनुमान यांची प्रतिमा, झेंडे, तोरण अशा विविध वस्तूंचे स्टिकर सेट, रामाची प्रतिमा असलेले कापडी झेंडे, मफलर, टोपी अशा अनेक वस्तू विक्रीस आल्या आहे.

नागरिकांकडून दुपटीने मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुकानाबाहेर लावलेले आकाशकंदील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. येत्या तीन ते चार दिवसात मागणी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विक्रीस आलेल्या या वस्तूंनी दिवाळीपूर्वीच दिवाळी आल्याचा भास नागरिकांना होत आहे.

वस्तू आणि त्यांचे दर

वस्तू दर

आकाशकंदील............२०० ते ६००

झेंडे....................५० ते १००

मफलर...................२० ते ३०

टोपी....................२०० रुपये शेकडा

स्टिकर सेट................२५०

''ऐतिहासिक सोहळ्यास घेऊन नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू खरेदी केल्या जात आहे. आकाश कंदील आणि झेंड्यांना अधिक मागणी आहे.''- इमान सय्यद, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अशोक खरात यांना पण ठेचण्याचे काम सुरू, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही - चित्रा वाघ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

SCROLL FOR NEXT