child marriage
child marriage esakal
नाशिक

आई-वडिलांचा अल्पवयीन लेकीच्या विवाहाचा कट फसला! गुन्हा दाखल

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि.नाशिक) : अल्पवयीन मुलीच्या (minor girl) विवाह प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाहास (child marriage) बंदी असतानाही बालविवाह लावल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. (Marriage-of-minor-girl-lasalgaon-marathi-news-jpd93)

अल्पवयीन लेकीच्या विवाहाचा कट फसला!

टाकळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. २९) लासलगावजवळील टाकळी विंचूर येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात बालविवाहास प्रतिबंध असतानादेखील अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात आला. या प्रकरणात पुरोहित, वधूचे वडील, वधूची आई, वर, वराची आई (सर्व रा. लासलगाव) व वराचे मामा (रा. टाकळी विंचूर) यांनी बालविवाहास प्रतिबंध असतानाही अल्पवयीन मुलीचा विवाह केला म्हणून त्यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम अनुसार ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार ठोंबरे व तपासी अंमलदार पोलिस नाईक एस. शिंदे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT