minor bride esakal
नाशिक

दिंडोरीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा प्रयत्न; नवरदेवाच्या गाड्यांच्या फोडल्या काचा

रामदास कदम

दिंडोरी (जि.नाशिक) : तालुक्यातील रवळगाव येथील अल्पवयीन मुलींना (minor bride) पैशांची फूस लावून त्यांचा विवाह (wedding) लावून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सामाजिक (social worker) कार्यकर्ते ग्रामस्थांच्या सतर्कतेने पोलिसांच्या (police) हवाली केले. काय घडले नेमके?

या घटनेमुळे खळबळ; येवला तालुक्यातील २० जणांवर गुन्हा दाखल

याबाबत माहिती अशी की, येवला तालुक्यातील सावरगाव, कासारखेडे येथील काही युवकांनी रवळगाव येथील दोन अल्पवयीन मुलींच्या कुटुंबाला पैशांचे आमिष दाखवून फूस लावून त्यांचा विवाह लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ टोंगारे, सोमनाथ निंबेकर व ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती मिळताच वऱ्हाडी मंडळींचा डाव हाणून पाडत २० जणांना पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी येवला तालुक्यातील २० जणांवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

नवरदेवाच्या कुटुंबातील वाहनांच्या काचा फोडून उपस्थितांना चोप

नवरदेवाच्या कुटुंबातील दोन स्कॉर्पिओ वाहनांच्या काचा फोडून उपस्थितांना चोप देण्यात आला. याप्रकरणी दशरथ पवार, अमोल पवार, सुनीता पवार, अक्षय पवार, योगेश पवार, ज्ञानेश्‍वर बोरसे, धार्मिक घेगडे, गोकुळ जाधव, सागर गायकवाड, संजय घेगडे, गोरख घेगडे, एकनाथ गायकवाड, रामेश्‍वर गायकवाड, रामदास गायकवाड, जनाबाई घेगडे, सीमाबाई घेगडे (सर्व रा. कासारखेडे), अण्णा मलिक, मीना मलिक (रा. दहेगाव, ता. नांदगाव), पप्पू पठाण, कासम शेख (रा. विसापूर, ता. येवला) यांच्यावर त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, कर्मचारी गायकवाड, खांडवी, चव्हाण तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला धक्का? महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, वाद पेटला

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT