नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून गुजरातच्या तरुणाला २.११ लाखांचा गंडा! मुलगी दाखवून नोटरी करार; गुगल पे आणि रोख स्वरूपात पैसे उकळल्याचा आरोप

CD
लग्नाचे आमिष दाखवून गुजरातच्या तरुणाला गंडा वणी, ता. १४ : लग्नाचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने दोन लाख रूपये पैसे घेत व न्यायालयीन विवाह न करता नोटरी करार करत विवाह झाल्यानंतर परतीच्या प्रवासात तरूणाची गाडी अडवून मारहाण करीत मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुरत येथील जगदीशकुमार गेहलोत यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरत येथील जगदीशकुमार गेहलोत हे खासगी नोकरी करतात. संशयित धोंडू नंदा साळवे (रा. मखमलाबाद, नाशिक) याच्याशी त्यांची दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीतून साळवे याने जगदीशकुमार याला लग्नासाठी मुलगी दाखविली. मुलगी पसंत पडल्यानंतर कमल (रा. नाशिक) व साळवे यांनी मध्यस्थी करून लग्न ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी संशयित यांनी जगदीशकुमार यांच्याकडून मुलगी पाहण्यासाठी आल्यानंतर गाडी भाड्याच्या नावाखाली पाच हजार रुपये, नाते ठरविण्यासाठी २० हजार रुपये आणि लग्नाच्या तयारीसाठी साडेसात हजार रुपये घेतले. पुढे जगदीशकुमार हे नाशिक येथे लग्नासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रोख व ऑनलाइन माध्यमातून पैसे दिल्यानंतर बोलीप्रमाणे प्रत्यक्ष न्यायालयीन विवाह न करता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्नासंबधी नोटरी करार करून त्यांचा विश्वास संशयित यांनी संपादीत केला. १२ ऑक्टोबरला रात्री आठला जगदीशकुमार हे परतीच्या प्रवासात पिॆंपळगाव - वणी रस्त्यावरील खेडगाव शिवारात सीएनजी पंपापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पोहोचताच त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी कारमधून आलेल्या काही तरुणांनी त्यांना मारहाण करून मुलीसह मंगळसूत्र, पर्स व रोकड घेऊन पसार झाले. या प्रकरणी धोंडू नंदा साळवे, कमलाताई, निकिता सखाराम गोळे (रा. भिवगाव बुद्रुक, सावखेड भोई, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

CBI Raid : पुण्यात सीबीआयचे छापे! ‘म्युनिशन्स इंडिया’च्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक; सव्वादोन कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT