death  esakal
नाशिक

Nashik News: काहीतरी पदार्थ खाल्ल्याने विवाहितेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर रोड परिसरातील आनंदवली येथे एका विवाहितेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिने काहीतरी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Married woman dies after eating poisonous food Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुप्रिया योगेश थोरात (३१, रा. काळे मळा, आनंदवली) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सुप्रिया या गेल्या १२ दिवसांपासून मानसिक आजारावर औषधोपचार घेत होत्या. मात्र, गेल्या रविवारी (ता. २८) रात्री त्यांनी राहत्या घरी काहीतरी पदार्थ सेवन केला.

त्यानंतर त्यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे नेमके कारण समजून आलेले नाही.

त्यासाठी शवविच्छेदन कक्ष प्रमुख डॉ. श्रावण गायकवाड यांनी व्हिसेरा राखून ठेवत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतरच मृत्यू नोंदीच्या तपासास वेग येणार आहे. तपास सहायक उपनिरीक्षक तानाजी झाडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT