नाशिक

‘मसाप’च्या इतिवृत्तात असंख्य चुका

CD
‘मसाप’च्या इतिवृत्तात असंख्य चुका चुकीच्या घटनांची नोंद केल्याचा सदस्यांचा दावा सकाळ वृत्तसेवा नाशिक : पुणे येते १६ ऑगस्ट २०२६ ला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेच्या इतिवृत्तात असंख्य चुका आढळून आल्या असल्याचे मंगळवारी झालेल्या बैठकीत सदस्यांना प्राप्त झालेल्या इतिवृत्तातून निदर्शनास आले आहे. त्यावरून कार्यकारी मंडळाच्या सदस्य गटाने तीव्र आक्षेप नोंदवत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ------------ कार्यकारी मंडळाची सभा माधवराव पटवर्धन सभागृहात झाली असताना इतिवृत्तात मात्र, कोहिनूर सभागृहाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच विषय पत्रिकेतील दिवंगतांना श्रद्धांजली आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन या दोन्ही विषयांचा एकमताने ठराव मंजूर असताना व स्वतंत्र ठराव करणे बंधनकारक असताना त्याचा उल्लेख इतिवृत्तात नाही. २५ जुलैच्या मागील सभेच्या इतिवृत्तातील त्रुटींबाबतही सदस्यांनी आक्षेप घेत दुरुस्त्या स्पष्टपणे नोंदविल्याशिवाय इतिवृत्ताला मंजुरी दिल्याचे मोघम नमूद करण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, ९९ नांदी संमेलनांसाठी बॅनर, स्मृतिचिन्हे आणि बुकमार्क साहित्य मसाप, पुणे तर्फे देण्यात येणार होते. त्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाईल असा ठराव दाखविण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया आणि कार्यकारी मंडळाची मंजुरी घेण्यात आली का? याची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या गटाने केलेली आहे. ----- कायदेशीर सल्ल्यानुसार पुढचे पाउल मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव मांडण्यात आल्याने आता पदाधिकाऱ्यांची पुढची भूमिका काय? याकडे सर्वांचे लक्ष असताना कायदेशीर सल्ल्यानुसार पुढले पाऊल उचलले जाईल अशी प्रतिक्रिया प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी दिली. ----- कोट सभेपूर्वी सभासदांना इतिवृत्त दिले असताना त्यावेळी चुका का निदर्शनास आणून दिल्या जात नाही? इतिवृत्त लेखनात चुका असतील मान्य आहे पण, सभेत बोलण्याची संधी असताना त्यावेळी मत न मांडता निघून जाणे कितपत योग्य आहे? याआधी इतिवृत्तात झालेल्या चुका दुरूस्त करून इतिवृत्त मंजूर करण्यात आले आहे. - स्वाती महाळंक, प्रमुख कार्यवाह, मसाप ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

SCROLL FOR NEXT