नाशिक

माता माधवींच्या पुतळ्याचे अनावरण

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो-NSK26H32070 धुळे ः छत्रपती अग्रसेन महाराज चौकात माता माधवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना आमदार अनुप अग्रवाल व मान्यवर. --- धुळ्यात मातृप्रेरणा माता माधवींचा पुतळा आमदार अनुप अग्रवाल यांच्याहस्ते अनावरण; स्थानिक विकास निधीतून काम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. ११) येथील मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज चौकात वीट, रुपयाच्या प्रतीक चिन्हे असलेल्या स्तंभासह मातृप्रेरणा माता माधवी यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी चौकातील नूतनीकरण झालेल्या श्री अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त अग्रवाल समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रम सुरू आहेत. जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून छत्रपती अग्रसेन महाराज चौकात माता माधवी यांचा पुतळा, तसेच एका स्तंभावर एक रुपया आणि विटेचे प्रतीक चिन्ह उभारण्यात आले. या स्तंभासह माता माधवी यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार अग्रवाल यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. याच वेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या चौकातील छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती अग्रसेन महाराज चौकाचे स्थानिक विकास निधीतून सुशोभीकरण करून दिल्यानिमित्त अग्रवाल समाजातर्फे आमदार अग्रवाल यांचा सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, अग्रवाल समाजाच्या प्रांतीय महिला अध्यक्षा मालती गुप्ता, ज्येष्ठ उद्योजक विनोद अग्रवाल, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. श्रीराम भतवाल, राजेश भतवाल, निरंजन भतवाल, भारती अग्रवाल, सौरभ गिंदोडिया, श्रेया अग्रवाल, मीना अग्रवाल, अनिता अग्रवाल, भाजपच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’च्या प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल, सारिका अग्रवाल, अजय अग्रवाल, सुमीत अग्रवाल, कैलास अग्रवाल, सुनील सिंघानिया, भारती सिंघानिया व समाजबांधव, भगिनी उपस्थित होते. --- चौकट रुपया आणि वीट प्रतीकांचा अर्थ छत्रपती श्री अग्रसेन महाराजांनी हरियानातील अग्रोहा साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी आपल्या राज्यातील आर्थिक विषमता दूर व्हावी आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या हेतूने जेव्हाही एखादा नवीन व्यक्ती किंवा कुटुंब अग्रोहानगरमध्ये कायमचे राहण्यासाठी येत असे, तेव्हा नगरातील प्रत्येक नागरिक त्या नवीन कुटुंबाला एक रुपया आणि एक वीट भेट म्हणून देत असे. यामुळे नवीन व्यक्ती स्वतःचे हक्काचे घर बांधू शकत असे आणि प्रत्येकाकडून मिळालेल्या एक रुपयामुळे त्या व्यक्तीकडे एक मोठी रक्कम जमा होत असे. या पैशांमधून तो आपला नवीन व्यवसाय किंवा व्यापार सुरू करू शकत असे. अग्रसेन महाराजांच्या या उदात्त हेतूचे प्रतीक म्हणून धुळ्यात या प्रतीकांचा स्तंभ उभारण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT