Maya Sonavane stormed with bowling in womens T-20 take 4 wickets against kerala  esakal
नाशिक

Cricket : महिला T-20 स्‍पर्धेत मायाची भेदक गोलंदाजी; टिपले 4 बळी

अरूण मलाणी

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने दमदार कामगिरी केली आहे. पुदुचेरी येथे सुरु असलेल्‍या या स्‍पर्धेत आंध्रप्रदेशच्‍या (Andhra Pradesh) संघापाठोपाठ केरळ (Kerala) विरुद्धच्‍या सामन्‍यातदेखील चार बळी (Wickets) टिपताना तिने भेदक फिरकीने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

या स्‍पर्धेत माया आपल्‍या फिरकी (Spinner) गोलंदाजीने सामना गाजवते आहे. मंगळवारी (ता.१९) दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षटकात केवळ १२ धावा देतांना ४ बळी घेतले. यात १२ निर्धाव चेडूंचा समावेश होता. सर्वाधिक ३० धावा करणाऱ्या केरळची कर्णधार एस सजनाला त्रिफळाचित करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला. या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळला ९० धावांत रोखले. महाराष्ट्राची स्‍थिती ५ बाद ६५ धावा अशी असताना, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्‍या मायाने नाबाद ५ धावा करता महाराष्ट्राला १८ व्या षटकात दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणेने हातभार लावला.

यापूर्वी पहिल्या सामन्यातदेखील काल (ता.१८) तिने चमकदार कामगिरी केली होती. आंध्र विरुद्ध प्रभावी गोलंदाजी करताना मायाने चार षटकात ३२ धावांत ४ बळी घेतले. यात ९ निर्धाव चेडूंचा समावेश होता. आंध्रच्या ७३ धावांच्या सलामीनंतर मायाने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्रला १३६ धावांत रोखण्यात महाराष्ट्राला यश आले. परंतु या सामन्‍यात आंध्रने महाराष्ट्र संघाला ९ बाद ९५ धावांवर रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभव स्‍वीकारावा लागला. या स्‍पर्धेत २१ एप्रिलला मेघालय, २२ ला हैदराबाद तर २४ एप्रिलला राजस्‍थान विरुद्ध महाराष्ट्र संघाची लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT