NSK26H33238
जळगाव : गोलाणी संकुलाच्या मागील रस्त्यावरील स्वच्छतेची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे.
---
शहरातील अस्वच्छताप्रश्नी महापौर आक्रमक
पाहणीनंतर कारवाईचे निर्देश; फुलांचा लिलाव स्थलांतरित करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत प्रभाग क्रमांक पाचमध्ये पाहणी करून अस्वच्छतेच्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासह खाऊ गल्लीत स्वच्छता राखण्याची सक्त ताकीद त्यांनी संबंधितांना दिली.
पाहणीदरम्यान जैन मंदिराची गल्ली, नवजीवन शॉप आणि अदिती साडीजच्या मागील परिसरात कचऱ्याचे ढीग आढळले. गटारींमधील अस्वच्छता आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नाराजी व्यक्त करत महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांकडून कामाचा आढावा घेतला. संबंधित ठिकाणांची तातडीने स्वच्छता करून कचऱ्या उचलण्याचे आदेश त्यांनी दिले. या वेळी नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेविका मंगला चौधरी, आशा पाटील, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता जितेंद्र रंधे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खाऊ गल्लीत अस्वच्छता
महापालिका इमारतीखालील खाऊ गल्ली असून तेथे अनेक खाद्य पदार्थ विक’त्यांचे दुकाने थाटलेली असतात. पाहणी दरम्यान येथे अस्वच्छता महापौरांना आढळून आली. महापौरांनी आरोग्य विभागाला तत्काळ परिसर स्वच्छ करून स्वच्छ व मोकळा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चौकट
पाण्याची नासाडी; कारवाईच्या सूचना
गोलाणी संकुलात फुलांच्या लिलावामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने हा लिलाव अन्य ठिकाणी हलविण्याबाबत महापौरांनी निर्देश दिले. पाहणीदरम्यान पाण्याची नासाडी होत असल्याचेही आढळले. संबंधितांकडून पाणी वाया घालविले जात असल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.