टुडे पान ३, मेन फिचर
---
NSK26H34367
जळगाव : नागरिकांकडून प्रभागातील समस्या जाणून घेताना महापौर दीपमाला काळे. सोबत नगरसेवक प्रकाश बालाणी, नगरसेविका रेश्मा काळे आदी.
----
पाणी वापरासाठी विहिरीच्या स्वच्छतेचे निर्देश
महापौरांची प्रभाग १५ मध्ये पाहणी; वाहतूक समस्यांवर तातडीची कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा केला. या दौऱ्यात ठिकठिकाणी साचणारा कचरा, गटारींची समस्या, अतिक्रमण आणि बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न समोर आला. यावर केवळ सूचना न देता संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करून समस्यांचे निवारण करावे, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. विशेषतः रचना कॉलनीतील बालवाडीजवळील मोठ्या विहिरीची स्वच्छता करून तिचे पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास त्यांनी सांगितले.
दौऱ्याची सुरुवात लाठी शाळेजवळून झाली. या परिसरातील गटारींची पाहणी करून त्यांची नियमित स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. सिंधी कॉलनी ते पंचमुखी हनुमान मंदिरादरम्यान तयार झालेले कचरा टाकण्याचे ठिकाण बंद करण्यास सांगण्यात आले.
रचना कॉलनी परिसरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. तसेच लाठी शाळेजवळील खुल्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्नही ऐरणीवर आला. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून नियमानुसार कारवाई करावी आणि अतिक्रमण अनधिकृत असल्यास ते हटवावे, असे महापौरांनी स्पष्ट केले. या वेळी नगरसेवक प्रकाश बालाणी, अरविंद देशमुख, नगरसेविका रेश्मा काळे, कलाबाई शिरसाळे तसेच आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता महेश सुर्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विहिरी उपयोगात आणा
यावेळी रचना कॉलनीतील बालवाडी परिसरातील विहिरीची पाहणी महापौरांनी केली. यात प्रमाणात कचरा आढळून आला. यावेळी महापौरांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या विहिरींची स्वच्छता करून पाण्याचा वापर शक्य आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले.
आठवडे बाजाराचे नियोजन करा
शनिवार बाजार परिसरात विक्रेत्यांच्या बसण्याच्या जागा निश्चित करण्यासाठी आखणीच्या रेषा मारण्याचे निर्देश देण्यात आले. विक्रेत्यांनी निर्धारित जागेतच व्यवसाय करावा, जेणेकरून रस्त्यावर वाहने येणार नाहीत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. परिसरात अस्वच्छता करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासही सांगण्यात आले.
चौकट
कचऱ्याचे ढीग, अतिक्रमणावरून संताप
महामार्गालगत साचलेला कचरा, रस्त्यांवर पडलेले भंगार व खुल्या भूखंडावर उभ्या केलेल्या जुन्या वाहनांमुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानां’तर्गत महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (ता.२) प्रभाक क्रमांक १६ मधील जुने जळगाव, ट्रान्सपोर्टनगर व लक्ष्मीनारायण नगर परिसराची पाहणी केली. यावेळी अस्वच्छता व अतिक्रमणांचे प्रकार पाहून त्यांनी दुकानदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले. अतिक्रमणे हटविणे, कचरा उचलणे व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.