नाशिक

अस्वच्छता पसरविणाऱ्यांना जागेवरच दंड करा

CD
NSK26H34518 जळगाव : प्रभाग १७ मधील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाबाबत संताप व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे. सोबत नगरसेवक अक्षय वंजारी आदी. ......... अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांना जागेवरच दंड महापौरांच्या सूचना; मनपाच्या जागा ताब्यात घ्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : मोकळ्या जागांवरील अतिक्रमण, अनधिकृत गोठे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाहणी दौरा केला. या दौऱ्यात महापालिकेच्या जागेवर उभारलेले गोठे आणि अनधिकृत व्यवसाय निदर्शनास येताच संबंधितांना जाब विचारण्यात आला. अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अतिक्रमित जागा तातडीने मोकळी करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेच्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’या प्रभागात पाहणी केली. यावेळी नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, नगरसेविका जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोकळ्या जागेवर अतिक्रमण एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजासमोर महापालिकेच्या जागेवर गाई-म्हशींचे गोठे उभारून व्यवसाय सुरू असल्याचे पाहणीत आढळले. परिसरात अस्वच्छताही पसरविण्यात आली होती. यावर महापौरांनी संबंधितांना जाब विचारत दंड आकारण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिकेची जागा तातडीने अतिक्रमणमुक्त करण्यास सांगितले. स्वच्छतागृह हटविणार मेहरूणमधील साईबाबा मंदिराजवळील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ते हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या जागेवर नागरिकांच्या सुविधेसाठी बाकडे बसविण्यासह गटारींची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. चौकट नाला सफाईकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी लक्ष्मी नगरमधील मोठ्या नाल्याची स्वच्छता रखडल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नाल्याची तातडीने सफाई करून आवश्यक ठिकाणी कल्वर्ट टाकण्यास सांगितले. दत्तनगरमध्येही प्रलंबित गटारींची कामे पूर्ण करण्यासह ओव्हरफ्लो होणाऱ्या गटारींची स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. पाहणीतील सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Latest Marathi News Live Update : शरद पवार मुंबईतील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

SCROLL FOR NEXT