Mayor Satish Kulkarni appealed to the citizens to wear masks Nashik Marathi News 
नाशिक

आयुक्तांपाठोपाठ महापौरही रस्त्यावर; नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक भागात नागरिक मास्क परिधान करत नसल्याने अखेरीस प्रशासन व लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागले. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतर आता महापौर सतीश कुलकर्णीदेखील रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत. 

महापौर कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. २०) शालिमार, सीबीएस, भद्रकाली, मेन रोड, बोहोरपट्टी, रविवार कारंजा, सरकारवाडा, जुने नाशिक, चौक मंडई, बागवानपुरा, कथडा आदी भागांचा दौरा केला. फळ, भाजी तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांना महापौर कुलकर्णी यांनी मास्क घालण्याचे आवाहन करताना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेची पाहणी केली. औषध फवारणीच्या सूचना दिल्या. रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर तसेच शासनाने घालून दिलेले जे नियम आहेत, ते पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, पश्चिमच्या जयश्री सोनवणे, भद्रकाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक साजन सोनवणे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT