crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : अपघातग्रस्त पिकअपमधून मांस जप्त

चाळीसगाव रस्त्यावर दहिवाळ शिवारात मांस वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने पिकअपचा अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : चाळीसगाव रस्त्यावर दहिवाळ शिवारात मांस वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप (एमएच १५ जीव्ही ५४२१) चालकाचा ताबा सुटल्याने पिकअपचा अपघात झाला.

यात एक जण जबर जखमी झाला.(Meat seized from accident pickup Nashik Crime News)

तालुका पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअपसह अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारे ८० हजार रुपये किमतीचे ४०० किलो मांस व पिकअप असा सुमारे २ लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली.

चाळीसगावहून मालेगावकडे मांस वाहतूक करणारी पिकअप भरधाव वेगाने येत होती. दहिवाळ शिवारात पिकअपवरील चालकाचा ताबा सुटला. यातून अपघात झाला. ३१ डिसेंबरला रात्री पाऊणच्या सुमारास हा प्रकार घडला.

मुश्रीफ व एकलाख शेख हुसेन (वय ३०, रा. आझादनगर) हे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून (एमएच १५ जीव्ही ५४२१) ८० हजाराचे ४०० किलो गोमांस अवैधरीत्या विनापरवाना वाहतूक करताना मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून पिकअप व मांस जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT